जालना । प्रतिनिधी – केंद्र सरकारच्या दूरसंचार व दळणवळण विभागाने हरवलेल्या/चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेणेकामी संचारसाथी पोर्टल सुरू केले आहे. संचारसाथी पोर्टल अंतर्गत उएखठ उशपीींरश्र र्एिींळिाशपीं खवशपींळीूं ठशसळीींशी हरवलेल्या / चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेणेकामी व ढAऋउजझ ढशश्रशलेा Aपरश्रूींळली ऋेी ऋीर्रीव चरपरसशाशपीं रपव उेर्पीीाशी झीेींशलींळेप नागरिकांच्या नांवे असलेले एकूण सिमकार्ड तपासण्यासाठी असे दोन पोर्टल उपलब्ध आहेत. सदर पोर्टलचे सर्व पोलीस ठाणेतील अधिकारी/कर्मचारी यांना हाताळणी प्रशिक्षण देउन जुलै 2023 पासून सर्व पोलीस ठाण्यात कार्यान्वित करण्यात आले होते.
जालना जिल्हयातील विविध पोलीस ठाणेस चोरीस गेलेल्या / हरवलेल्या मोबाईलच्या नोंद केलेल्या तक्रारी पोलीसांनी पोर्टलवर अपलोड करून तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा शोध घेउन मागील 03 महीन्यात जिल्हयात विविध पोलीस ठाणेस नोंद असलेल्या 360 तक्रारीमधील एकूण 156 मोबाईल जे एकुण 21,40,000 हजार रुपये किंमतीचे मोबाईल आजपर्यत शोधून काढण्यात जालना जिल्हयातील सायबर पोलीस ठाणेतील पोलीसांना यश आले आहे.
त्यामध्ये चोरीस गेलेल्या/हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात जालना सायबर पोलीस ठाणे आघाडीवर असून जालना सायबर पोलीसांनी तांत्रिक पद्धतीने मोबाईलचा शोध घेउन जिल्हयात विविध पोलीस ठाणेस पोर्टलवर अपलोड असलेल्या 360 तक्रारीमधील 156 मोबाईलचा शोध जालना सायबर पोलीसांनी घेतला असून आज रोजी मा. विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब परिक्षेत्र छ. संभाजीनगर व मा. पोलीस अधिक्षक श्री अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते तक्रारदार यांना मोबाईल परत करण्यात आले. त्यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी पोलीसांचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना श्री. अनंत कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/गुणाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक / योगेश चव्हाण, सपोउपनि / पाटोळे, पोहवा/गणेश राठोड, पोहवा/मनोज हिवाळे, पोहवा/सचिन चौधरी, पोहवा/विनोद निकम, पोहवा/सुरज चरावंडे, पोना/ संदीप मांटे, पोना/ विजय खरात, पोकॉ/सुधाकर भवर, पोकॉ/ दिलीप गुसींगे, पोकॉ/गजानन मुरकटे तसेच महीला पोलीस अंमलदार मपोहवा/ ज्योती पालवे, मपोहवा/रेणुका नागरे, मपोहवा / सपना ठाकुर मपोकॉ/ कविता दुनगहु यांनी केली आहे.
सर्व नागरिकांना सायबर पोलीस ठाणे, जालना तर्फे आवाहन करण्यात येते की, मोबाईल चोरी झाला किंवा हरवला तर जवळच्या पोलीस ठाणेस तक्रार नोंद करावी. त्यानंतर स्वतःचे आधार कार्ड व पोलीस ठाणेच्या फिर्यादी प्रतसह उएखठ उशपीींरश्र र्एिींळिाशपीं खवशपींळीूं ठशसळीींशी या पोर्टलचे कामकाज पाहणार्या संबंधित पोलीस ठाणेच्या अधिकारी व अंमलदारास भेटून आपली फिर्याद पोर्टलवर ऑनलाईन नोंद करावी किंवा सायबर पोलीस ठाणे जालना येथे संपर्क करावा.