मंठा । प्रतिनिधी –
धन्य आज दिन । झाले संतांचे दर्शन ॥1॥ झाली पापातापा तुटी । दैन्य गेले उठाउठी ॥धृ॥
झाले समाधान । पायी विसावले मन ॥2॥ तुका म्हणे आले घरा । तोचि दिवाळी दसरा ॥3॥
संतांचे आज दर्शन झालं मी धन्य झालो. म्हणत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी श्री संत जनार्धन महाराज संस्थानासाठी नवीन सभागृहकरीता एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन या वेळी आ. लोणीकर यांनी दिले. ते ते श्री संत जनार्धन महाराज संस्थान पेवा (नळडोह) तालुका मंठा जिल्हा जालना येथे श्रावण मासातील भव्य कीर्तन सोहळा समाप्ती निमित्त आयोजित ह. भ. प. अर्जुन महाराज लाड गुरुजी (केज धारूरकर) यांच्या काल्याच्या कीर्तन सोहळ्या काल्याचे किर्तन संपल्यावर उपस्थित भाविक भक्तांना उद्देशुन ते बोलत होते.
पुढे बोलतांना आ. लोणीकर म्हणाले की, आज संतांचे दर्शन झाल्याने पाप, ताप नष्ट झाले, दैन्य पहाता पहाता दूर झालं. मनाला समाधान झालं, संतांच्या चरणावर माझं मन विसावलं. तुकाराम महाराज म्हणतात, संत माझ्या घरी आले हाच माझा दिवाळी दसरा आहे. याच प्रमाणे आज येथे ह. भ. प. अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचे काल्याचे कीर्तन श्रवन केल्याने मन अगदी प्रसन्न झालं आहे. संतांनी आपल्या आचार-विचारांतून, तत्वज्ञानांतून, अभंग-संकीर्तनातून महाराष्ट्राच्या या शुष्क माळरानावर भक्तीचे नंदनवन फुलविले. जातिभेदाच्या तटभिंती उध्वस्त केल्या. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणार्या भागवत धर्माची पुनर्स्थापना केली आणि याच धर्माने जीवन जगण्याचे संदर्भ शिकवले..! महाराष्ट्र हे भाग्यवंत भाविक भक्तांचे राज्य आहे. असल्याचेही आमदार लोणीकर यावेळी म्हणाले.
या वेळी आमदार बबनराव लोणीकर यांच्या सोबत गणेशराव खवणे, सतीश निर्वळ, पंजाब बोराडे, भाऊसाहेब गोरे, विठ्ठल काळे, मोहन आडे, राजेश मोरे, गजानन देशमुख, विलास घोडके, मनोज देशमुख, दीपक बोराडे, शरद मोरे, भगवानराव देशमुख, महेश पवार, नरेंद्र ताठे, अनंत जाधव, अशोक सोनटक्के, भगवान वरंकर, गणपतराव थोरात, शिवशंकर डोईफोडे, प्रकाश गव्हाळे, प्रकाश गडदे, श्रीराम जाधव, सचिन राठोड, जानकीराम महादेव बाहेकर, जुनेद पठाण, तोफिक कुरेशी, चव्हाण नवनाथ खंदारे, नवनाथ चट्टे, राजेश मस्के, प्रसाद गडदे, बाळू काळे, नंदू टकले, गजानन ऊरदुख, जगदीश जाधव, कपिल तिवारी, वैभव नरवडे यांची उपस्थिती होती.
श्री संत जनार्धन महाराज संस्थान पेवा (नळडोह) तालुका मंठा जिल्हा जालना येथे सभागृह बांधकामासाठी यापूर्वी आपण 30 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला असून. पुढील मोठ्या सभागृहाकरिता आपण भावी काळात एक कोटी रुपये निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासनबरोबरच सर्व हिंदू धर्मियांना व हिंदू भाविक भक्तांना गर्व वाटावा असे भव्य दिव्य जगातले सर्वात सुंदर प्रभू श्रीरामाचे मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आयोध्येत साकार झाल्याचे आ. लोणीकर यांनी सांगितले.