जालना रेल्वे स्थानकाजवळ नगरसोल काचिगुडा रेल्वेमधून पडून एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू

12

जालना । प्रतिनिधी – दिनांक 3 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नगरसोल काचिगुडा या रेल्वेमधून एका 22 वर्षीय तरुणाचा पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिरामण नामदेव गंगातीर्थे रा. कुशनूर ता. नायगाव जिल्हा नांदेड असे मयत तरुणाचे नाव आहे. हिरामण गंगातीर्थे हा आई-वडिलांसोबत सैलानी येथे दर्शनासाठी गेला होता. परत आल्यावर त्यांनी जालना येथील बस स्टँडवर रात्री मुक्काम केला सकाळी रेल्वे पकडून ते आपल्या गावी नांदेड कडे जात होते. रेल्वे जालना रेल्वे स्थानक पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर गेल्यावर जेवण करण्यासाठी हात धुत असताना तोल जाऊन गाडीखाली आला. युवकाचा रेल्वेखाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती कळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेऊन शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवले आहे.