जालना । प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी मागील काही महिन्यापासून समाज माध्यमावरती सोशल मीडियावरती व मीडियाबाईच आणि जाहीर रॅली मधून अल्पसंख्याक समाजाबद्दल अपशब्द काढून दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आमदार नितेश राणे हे मागील काही दिवसापासून सतत शासनाच्या कृपेने हिंदू मुसलमान वाद निर्माण करण्याचा व राज्य अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्या अशा बेताल वक्तव्यामुळे राज्यात काही माथेफिरू लोक दंगली घडण्याची शक्यता आहे म्हणून आमदार कैलाश गोरांट्याल यांचे मार्गदर्शना खाली माननीय जिल्हाधिकारी साहेब आपल्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे की आपण आमदार नितेश राणे याला तात्काळ अटक करून त्यावरती योग्य ती कारवाई करून त्यास जाहीर सभेमधून कुठल्याही धर्माबद्दल बोलण्यापासून थांबवावे तसेच त्यास प्रेस ,सोशल मीडिया किंवा रॅली मधून भाषण करण्यास बंदी घालावी .
असे न केल्यास आम्ही नितेश राणे यांना काळ फासू व यानंतर काही वाद निर्माण झाल्यास सर्व जबाबदारी ही शासनाची राहील हे आपणास या निवेदनाद्वारे कळवत आहे .आपण माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आपल्या स्तरावर याबाबत कळवावे. व आपल्या गौरवशाली राज्यामध्ये जाणून-बुजून शासनाच्या कृपेने हिंदू-मुस्लीमांमध्ये दंगल घाडवण्यासाठी काही माथेफिरू लोकांना प्रवर्त करत असल्यामुळे आमदार नितेश राणे यांना तात्काळ अटक करून जेलमध्ये टाकावे व राज्यातील सर्व तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना गुना गोविंदांन एकत्र राहू द्यावे,
निवेदनावर जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग, जालनाचे अब्दुल रफीक अब्दुल रशीद, अॅड. राम कुर्हाडे (प्रदेश सरचिटणीसमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), शेख रिजवान (उपाध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक, जालना), आसिफ जमिनदार, (तालुका अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग परतूर), सय्यद जावेद स.नवाब (तालुका अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, अंबड), शेख असलम, सय्यद रशीद, चंद्रकांत रत्नपारखे (उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी, जालना), गणेश चोधरी (सामाजिक कार्यकर्ता, तथा चौधरी ब्लड डोनर ग्रुप, जालना), खान आमजद (सामाजिक कार्यकर्ता, जालना), खलील पटेल, (तालुका अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग घनसावंगी) आदींच्या स्वाक्षर्या आहेत.