जालना । प्रतिनिधी – शिवसेना उपशहर प्रमुख नजीर शेख, ज़फर खान, बिलाल सौदागर यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी दिले पदाचे राजीनामे दिले आहे. यापुर्वी देखील मुस्लीम समाजातील अनेक पदाधिकार्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महंत रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्याने जालन्याच्या मुस्लिम बांधवांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिला. शिवसेना उपशहर प्रमुख नजीर शेख, शिवसेना अल्पसंख्याक शहर जिल्हाप्रमुख जफर खान,
अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष बिलाल सौदागर. यांच्या नेतृत्वात
आज दिनांक तीन मंगलवार रोजी तीन वाजेच्या सुमारास बस स्थान येथील शेख नजीर यांच्या कार्यालयावर शेकडो मुस्लिम बांधवांनी आपल्या पदाचे आज राजीनामे दिलेत.
जगाला शांतीचे संदेश देणारे प्रेषित पैगंबर यांच्याबाबत रामगिरी महाराज यांनी अतिशय बेताल वक्तव्य केल्याने मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या,
त्या वक्तव्यामुळे राज्यभरात मुस्लिम समाजाने महंत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध केलं होता. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामगिरी महाराज यांचं समर्थन केल्यानं जालन्याच्या शेकडो शिवसैनिकांनी पदाचे राजीनामे दिलेत. शिवसेना उपशहर प्रमुख नजीर शेख यांच्या नेतृत्वात शेकडो तरुणांनी पदाचे राजीनामे दिल्याने जालन्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसलाय.
दरम्यान जरी मी पदाचा राजीनामा दिला असला तरी आम्ही सगळे शिवसेना उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि उपाध्यक्ष विष्णू भाऊ पाचफुले यांचे एकनिष्ठ राहून त्यांचं काम करणार अशी प्रतिक्रिया नजीर शेख यांनी दिलीय.