जालना । प्रतिनिधी – बदलापूर, कलकत्ता सह देशभरात घडणार्या महिला अत्याचाराच्या अमानवी घटनांतील नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असा संदेश युवा हिंदुत्व प्रतिष्ठानने दहीहंडी महोत्सवातून दिला. डीजेच्या तालावर शिवसेना उपनेते, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यासह गोविंदांनी ठेका धरत एकच जल्लोष केला.
गोकुळाष्टमी चे औचित्य साधून जालना शहरातील छत्रपती संभाजी नगर लगत असलेल्या स्व. गोपीनाथराव मुंढे चौकात युवा हिंदुत्व प्रतिष्ठानच्या वतीने यंदा प्रथमच दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना उपनेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर, रिलस्टार पल्लवी सरकटे- भुतेकर,विष्णू पाचफुले, मनसेचे जिल्हाप्रमुख रवींद्र राऊत, मेघराज चौधरी, दीपक जगताप,प्रकाश जगताप, राजेश जगताप, यशराज खोतकर, अंकुश पाचफुले,सतीश जाधव, योगेश भगत, मनोज लाखोले, दीपक राठोड ,अजित चौधरी, शिवसिंग तिलवारे , अभिषेक काबलिये ,राजू गुलगे, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यावेळी शुभेच्छा देतांना म्हणाले, भगवान श्रीकृष्णांनी 18 पगड जातीतील गोविंदा- गोपाळांना एकत्र करून समान वागणूक दिली. असे सांगून युवा हिंदुत्व प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून व्यक्त केलेली संतापाची भावना, दिलेला संदेश आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविणार असल्याचे खोतकर यांनी याप्रसंगी सांगितले. विष्णू पाचफुले ,रवींद्र राऊत, पल्लवी सरकटे- भुतेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक आकाश जगताप पाटील यांनी केले तर बालाजी टेकाळे यांनी सूत्रसंचालन केले. दहीहंडी महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आकाश जगताप, कृष्णा जगताप ,उमेश पवार, रोहित साखरे, सचिन तारगे ,शंकर ठोकर, शुभम जगताप ,संकेत शीलवत, यश शर्मा, गणेश पाखरे, निलेश दानवे, शुभम डुकरे ,सचिन काटकर ,सुशील दंडाईत, शुभम शिंदे, ऋषिकेश शहागडकर ,कृष्णा गावडे, आदींनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे दहीहंडी फोडण्यापूर्वी बलात्कारांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांना महिला, मुलींच्या हस्ते जोडे मारण्यात आले. गोविंदांनी डीजेच्या तालावर बेभान होऊन नृत्य करत चार थर लावून दहीहंडी फोडली. यावेळी परिसरातील महिला, नागरिक तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.