शहर मनपा हद्दीमध्ये प्रशासनाच्या वतीने शहिद भगतसिंह स्मारक उभारण्याची मनपा आयुक्तांकडे मागणी

11
जालना – शहरातील मनपा हद्दीमध्ये शहिद भगतसिंह स्मारक उभारण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तात्काळ विशेष प्रयन करण्यात यावे अशी मागणी आज दि. 2 सोमवार रोजी दुपारी 2 वा.च्या सुमारास सरदार शहीद भगतसिंग मित्र मंडळ,सिगलीकर समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की,मनपा शहर जालनाच्या वतीने अधिकृतरित्या कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आद्यापपर्यंत जालना शहरामध्ये शहिद भगतसिंह यांच्या नावाने कुठेही मार्ग, पुतळा अथवा स्मारक उपलब्ध नाही. त्यामुळे येणाऱ्या पिढील शहिद भगतसिंह यांच्या कार्याची आठवण रहावी यासाठी शहरातील मनपा हद्दी मध्ये शहिद भगतसिंह स्मारक उभारण्यासाठी योग्य प्रयत्न करण्यात यावे. त्यासाठी येत्या २८ सप्टेंबर रोजीच्या शहिद भगसिंह जयंतीच्या पुर्वी जागा नियोजीत करुन, कायदेशीर व तांत्रिक बाबींची पुर्तता करुन स्मारक उभारणीचे काम पूर्ण करावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनावर संतोषसिंह कलाणी, संदिपसिंह भागा, सतनामसिंह टाक, कलदिपसिंह कलाणी, जितुसिंह टाक, गुरमितसिंह कलाणी, मोनुसिंह कलाणी, कुंदनसिंह टाक, अभिजीतसिंह टाक, लक्कीसिंह ई. च्या स्वाक्षऱ्या आहेत.