टोळक्यांनी चोरून नेली दुचाकी

61
जालनाः शहरातील सिव्हील क्लब कार्यालयासमोरील करवा नगरच्या गल्लीमध्ये उभी केलेली होंड शाईन कंपनीची लाल काळ्या रंगाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 30 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली. गणपती गल्ली भागात राहणारे गणेश लोखंडे यांनी त्यांची दुचाकी एमएच 21 बीएम 9214 सव्वानऊ वाजेच्या सुमारास करवा नगरातील गल्लीत उभी करून आझाद मैदान येथे गेले होते. आझाद मैदानात दहीहंडी कार्यक्रम असल्याने मोठ्या प्रमाणा दुचाकी लावण्यात आल्या होत्या. याच संधीचा  फायदा घेत चार ते पाच जणांच्या टोळक्याने ही दुचाकी चोरून नेली. टोळीतील दोन युवक सदर दुचाकी चोरून नेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या संदर्भात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार देवाशीष वर्मा हे करीत आहेत.