मतदार संघात ढगफुटीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानाची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी; 24 तासाच्या आत झालेल्या प्रचंड नुकसानीचे पंचनामे करा- आमदार लोणीकरांचे यंत्रणांना आदेश

9
मतदार संघातील जवळपास सर्वच्या सर्वच मंडळात 65 मिलिमीटर पेक्षा अधिकचा पाऊस झालेला असून काही मंडळात तर अक्षरशा 180- 200 मिलिमीटर पर्यंत पाऊस झाल्याने अनेक गावातील घरांमध्ये पाणी शिरले तर शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके वाहून गेली त्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा असे निर्देश आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील सर्वच यंत्रणांना दिले आहेत
काल दुपारपासूनच माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर हे विविध प्रशासकीय यंत्रणांच्या संपर्कात राहून वेळोवेळी सूचना देत होते या पार्श्वभूमीवर आज माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंठा तालुक्यातील
मंठा शहरातील सुगंधा नगर, पाटोदा, हेलसवाडी लिंबेवडगाव पांगरी खुर्द खोराड सावंगी आदी  गावात जाऊन नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली
   या पाहणी दौऱ्या दरम्यान आमदार लोणीकरांनी थेट नुकसानग्रस्तांच्या घरी जाऊन पाहणी केली
  यावेळी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी, मतदार संघातील सर्वच भागात सरासरीपेक्षा खूप अधिकचा पाऊस झाला असून या पावसामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगतानाच अनेक गावातील घरांची पडझड झाली आहे शाळा खोल्या नेस्तनाबूत झाले आहेत, घरातील अन्नधान्य अक्षरशा पाण्यात वाहून गेले आहे तसेच शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून अनेकांच्या शेतातील उभी पिके आडवी झाली असल्याचे सांगितले
पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले, पांगरी बुद्रुक गावाला पाण्याचा वेढा पडला होता तर पाटोदा येथील प्रवाहा मुळे  अडकले होते यासंदर्भात आपण जिल्हाधिकारी महोदय पोलीस अधीक्षकांशी बोलून तात्काळ एन डी आर एफ च्या टीमला प्राचार्य करत या 15 लोकांना सुखरूप बाहेर काढण्याची आमदार लोणीकर यांनी नमूद केले
पुढे ते म्हणाले की झालेले नुकसान हे प्रचंड असून यामुळे शासन स्तरावरून तात्काळ मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजित दादा पवार, यांच्याशी पत्रव्यवहार केला असून नुकसानग्रस्तांना तात्काळ मिळत मिळावी या साठी विनंती केली असून भ्रमणध्वनीवरून त्यांच्याशी माझा संपर्क झाला असल्याचे यावेळी नमूद केले
मंठा परतूर नेर शेवली भागात प्रचंड पाऊस पडल्यामुळे रात्रीपासून मी स्वतः अनेक कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यासोबतच जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक उपाध्यक्ष जिल्हा पोलीस प्रमुख तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्यामार्फत यंत्रणा गावागावात पाठवल्या असून जिथे कुठे धोका अधिकारी त्या त्या ठिकाणी या सर्व यंत्रणा रात्रीपासूनच कार्यरत झाले असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर मनाली की, उद्भवलेल्या परिस्थितीने नुकसानग्रस्तांनी खचून न जाता खंबीर तिने सामना करावा यासाठी आपण व प्रशासन आपल्या पाठीशी खंबीर असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
 यावेळी उपविभागीय अधिकारी श्री गायकवाड  तहसीलदार श्रीमती जोंधळे, पंजाबराव बोराडे विठ्ठलराव काळे, विलास घोडके कैलास चव्हाण, प्रसाद बोराडे दीपक बोराडे, माऊली गोंडगे, मुस्तफा पठाण, मनोज देशमुख, तानाजी शेंडगे मदन बोराडे मधुकर काळे अच्युत बोराडे नैनाजी काळे रोहिदास बोराडे अशोक बोराडे विष्णू बोराडे संदीप बोराडे उद्धवराव बोराडे नेनाजी काळे जानकीराम चव्हाण ज्ञानदेव बोराडे रामा बाजार कुलकर्णी वसंत घुटे, उमेश काळे यांच्या सह नुकसानग्रस्तांची उपस्थिती होती