जैन मंदिर जवळील किरकोळ कारणावरून तरुणावर चाकू हल्ला.. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, रेहान रशीद शेख असं जखमी तरुणाचे नाव..

78

जालन्यात किरकोळ कारणावरून तरुणावर चाकू हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय. रेहान रशीद शेख असं जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर शहरातील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेहान रशीद शेख याच्या कडे शेख आदिल शेख कलीम, अफरोज खाज्या शहा आणि अजय आढाव यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र पैसे देण्यास रेहान शेख याने विरोध केला, त्याचा राग मनात धरून शेख आदिल आणि अफरोज शहा यांनी रेहान वर चाकूने वार करून
पोटात व छातीजवळ मारून गंभिर जखमी केलंय. तसेच रेहान जवळील 640 रुपये आणि त्याचा मोबाईल फोन घेऊन ते तिघे पसार झालेत. सदर घटना ही दिनांक 31 शनिवार रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जालना शहरातील जैन मंदिर जवळील भाग्यनगर कडे जाणार्‍या रोडवरील घडली असून या प्रकरणी रेहानची आई रियाजबी शेख रशीद यांच्या फिर्यादीवरून आज दिनांक एक रविवार रोजी रात्री 04:30 वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलिस ठाण्यात नवीन कायद्याप्रमाणे कलम 109, 119(1), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातील पुढील तपास कदिम पोलीस करीत आहेत