कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयामध्ये ‘महावाचन चळवळ महोत्सव’ घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके शाळेच्या प्रांगणात ग्रंथालयातून आणून वाचली.त्यामध्ये डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम ,साने गुरुजी,महात्मा फुले, सुनिल गावसकर, श्यामची आई, अकबर बिरबल यांच्या गोष्टी, वि.दा.सावरकर,शालेय विचार,आरोग्य, मिरा बोरवणकर,कविता अशी विविध पुस्तके आज विद्यार्थ्यांनी वाचली.शाळेच्या ग्रंथपाल श्रीमती. कोळेश्वर् यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे संच वाचायला दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत ही व्यक्त केले.विद्यार्थी रोज पुस्तके वाचतात,मात्र अवांतर पुस्तके वाचली पाहिजे त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते असे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.मिनाक्षी कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी शिक्षक संदीप इंगोले, मदन सोजे,भीमाशंकर कुलकर्णी, राजाराम साबळे, अलकनंदा गाडेकर,प्रगती भालेकर उपस्थित होते.