महाराष्ट्रत महाविकास आघाडी कडून होत असलेले गलिच्छ राजकारण व राज्याचं वातावरण गढूळ करण्याच्या दृष्टिकोनातून केल्याजणाऱ्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी जालना जिल्ह्यातील सर्व युवा मोर्चा पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी यांच्यावतीने महाविकास आघाडीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्करआबा दानवे यांनी बोलताना, “आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी या प्रकारचे गलीच्छ राजकारण महाविकास आघाडी करत आहे” अश्या तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने शिवरायांचा पुतळा हटविला, तेव्हा तुमची जीभ गोंदियात लटकली होती का? हीच का तुमची शिवभक्ती? असा सवाल ही महाविकास आघाडीला यावेळी भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना महानगराध्यक्ष अशोक (अण्णा) पांगारकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, जालना महानगर युवा मोर्चा अध्यक्ष अमोल धानुरे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपील दहेकर, जालना तालुका युवा मोर्चा अध्यक्ष मुकेश चव्हाण, अल्पसंख्याक महानगराध्यक्ष इम्रान सय्यद, प्रमोद गंडाळ, विजय मोहिते, कृष्णा चव्हाण, सुमित सुरडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.