जालना येथे उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

19
 मिटकॉन प्रशिक्षण केंद्र, जालना व उद्योग विकास विभाग आणि शासकीय औद्योगिक विकास महामंडळे यांच्या वतीने जालना येथे दि.११ सप्टेंबर २०२४ पासुन एक महीना कालावधीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‌          सदरील प्रशिक्षण कार्यक्रमात युवक व युवतींसाठी स्वत:चा उद्योग/व्यवसाय उभारणीसाठी व कर्ज प्रकरण करण्यासाठी हा प्रशिक्षण वर्ग अंत्यत महत्त्वाचा राहणार आहे.या प्रशिक्षण कार्यक्रमात सौर ऊर्जा (सोलर एनर्जी) , विद्युत वाहणे (इलेक्ट्रिकल व्हेअकल) व सायबर सुरक्षा व इतर अनेक उद्योग या बाबतीत थेरी व प्रात्येक्षिकासह मार्गदर्शन राहणार आहे. या प्रशिक्षणात मशिनरी हाताळणे, सोलर एनर्जी प्लेट तयार करणे,कच्चामाल,साहीत्य,कॅपीसिटी,जोडणी व विक्रीव्यवस्था, बिघाड दुरुस्ती व उपलब्ध प्लॅन्ट या सोबत उद्योग संधी मार्गदर्शन, उद्योग प्रेरणा, संघटन कौशल्य, उद्योजकीय गुणसंपदा,व्यक्तीमत्व विकास, प्रभावी संभाषण कौशल्य, उद्योग व्यवस्थापन, जागेची निवड, बाजारपेठ पाहनीतंत्र, शासकीय व निमशासकीय योजना, जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजना,खादीग्राम उद्योगांच्या योजना, महामंडळाच्या विविध योजना, कृषी संलग्न योजना, राष्ट्रीय पशुधन योजना,प्रकल्प अहवाल तयार करणे, कर्ज प्रस्ताव तयार करणे,  बॅंकेची कार्यप्रणाली , विक्री व्यवस्था,भांडवल  उभारणी ,मनुष्यबळ , विमा संरक्षण, शासकीय परवाने, प्रशिक्षण प्रमाणपत्र इत्यादी बाबतीत तज्ञ प्रशिक्षक, वरिष्ठ अधिकारी व यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
अधिक माहिती व प्रवेश अर्जासाठी के डी दांडगे ,जिल्हा प्रकल्प अधिकारी ,मिटकाॅन द्वारा पत्रकार भवन, एस. पी. ऑफिस समोर , शासकीय ग्रंथालयाच्या बाजूला जालना.मो.९४२३७३०९३२ येथे दि.११ सप्टेंबर २०२४ पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन के डी दांडगे मिटकाॅन जालना यांनी केले आहे.