आज दिनांक एक सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास जालना शहरात एम एस जैन इंग्लिश स्कूल वाचवण्यासाठी व संस्थाचालकांनी जो निर्णय घेतला आहे शाळा बंद करण्याचा या निर्णयाच्या विरोधात मराठवाडा शिक्षक संघटनेच्या वतीने शाळा बचाव शांतता रॅली काढण्यात आली. ही रॅली एम. एस. जैन स्कूल शाळे पासून सुभाष चौक ,महावीर चौक, मामा चौक, वीर सावरकर चौक, सुभाष रोड, फुल बाजार, कादराबाद ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत शाळेसंदर्भात भर पाऊसात जनजागृती करत शाळा वाचवण्याचे घोषणा देत रॅली काढण्यात आली आहे याप्रसंगी बोलताना मराठवाडा शिक्षक संघाचे प्रा.मारुती तेगमपुरे यांनी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे की , ज्या शाळेचे 1973 पासून आज रोजी पर्यंत जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये जे विद्यार्थी यशस्वीपणे आपली छाप सोडत आहेत अशी शाळा बंद करण्या चा निर्णय राष्ट्र विकासासाठी बाधा ठरणारी गोष्ट आहे, तसेच शाळा बंद करणे आणि धंदा करणे या दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे शाळा बंद करण्याच्या विचार चुकीच आहे , शिक्षकांच्या अडीअडचणी बसून कशा सोडवता येतील याचा विचार शाळा व्यवस्थापनाने करावा असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी संजय येळवंते, आरेफ कुरेशी, ज्ञानोबा वरवटे,सोहम बोदवडे, इम्रान सिद्दिकी, सेवानिवृत्त शिक्षिका सुरेखा जोशी, शाळेच्या माजी विद्यार्थिनी साक्षी अंजान, राजबाला झोळगीकर आदींनी आपल्या भावना व्यक्त करून शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध केला. यानंतर मराठवाडा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक भारती यांच्या मार्फत श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या अध्यक्ष व सचिवांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
या रॅलीत मराठवाडा शिक्षक संघाचे भीमाशंकर शिंदे, नारायण मुंढे, जगन वाघमोडे, दीपक शेरे, प्रदुघ्न काकड, तुकाराम पडघन, भगवान धनगे, ज्योती पांगारकर यांच्यासह श्री एम. एस. जैन इंग्लिश स्कूलचे शिक्षक उर्मिला मांधना, संजोकता कत्तुल , दीक्षित एस, खान समीना , सोनाली वाघमारे , रूपाली जोशी,राजश्री बचाटे , दिपीका बोरकर, वर्षा गाजरे , पल्लवी कुलकर्णी, विना जोशी , काजल पाटील , वांगीकर वर्षा,
देशमुख सविता , रश्मी गोगटे , प्रशांती झोडगीकर , श्रुती मेहुलकर, शारदा यादव , अनिता परमार , पल्लवी बांगर , मनीषा क्षीरसागर , शोभा ठोकळ , भिकाजी चेडे , प्रतिक क्षीरसागर , ज्ञानेश्वर देशमुख , लखन राजपूत , मनोज राजपूत , श्याम राठोड, सुनील चव्हाण , भगवान अंभोरे मनोज बसय्ये, शाम नंद मुरलीधर लबडे आदींचा समावेश होता.