राज्य सरकारच्या विरोधात जालन्यात महाविकास आघाडीचे जोडे मारो आंदोलन

6

जालना (प्रतिनीधी)मालवण येथे निकृष्ट पद्धतीने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यामुळे देशातील जनतेच्या अस्मितेला काळीमा फासणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आज रविवार रोजी जालना जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडो मारो आंदोलन करून शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळा प्रकरणी महविकास आघाडीच्या वतीने आज रविवारी जिल्ह्याच्या ठिकाणी जोडो मारी आंदोलन करून शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. या अनुषंगाने जालना येथेही महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत जालनेकरांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आ.कैलास गोरंटयाल म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या कामात देखील भ्रष्टाचार करण्याचा नीचपणा करून देशाच्या अस्मितेला कलंक लावण्याचा दुर्दैवी प्रकार समोर आल्याने त्याच्या प्रवृत्तीची देशाला जाणीव झाली आहे असे सांगत आ. गोरंटयाल यांनी शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक मोठी प्रकरण केल्याचे उघड झाले आहे. परंतु हा प्रकार जनतेच्या अस्मितेचा असल्याने जनता त्यांना कदापि माफ करणार नाही. कार्यकर्त्यांनी त्यांचा हा निंदनीय प्रकार गावागावात जाऊन सांगावा आणि हे भ्रष्ट सरकार खाली खेचल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही असा विश्वास शेवटी अंबेकर यांनी व्यक्त केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत महायुतीचे सरकार खाली खेचून जनता सरकारचा बदला निश्चितपणे घेईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी आमदार संतोष सांबरे, शिवसेना नेते डॉ.संजय लाखे पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे, शहरप्रमुख बाला परदेशी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र राख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे यांनी आपल्या भाषणातून राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला. या आंदोलनाचे प्रास्ताविक करतांना जालना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद यांनी आंदोलनामागील भूमिका विषद केली. यावेळी युवा नेते अक्षय गोरंटयाल, रमेश पाटील गव्हाड, मुरलीधर शेजुळ, मनीष श्रीवास्तव, राम सावंत, नंदाताई पवार, वसंत जाधव, दिनकर घेवंदे, हरिहर शिंदे, बाबू पवार, मनकरनाताई डांगे, गंगुबाई वानखेडे, मंगल मिटकर, विभा लाखे, राजेंद्र जाधव, दुर्गेश काठोठीवाले, महावीर ढक्का, रमेश गौरक्षक, जगदीश भरतिया, कृष्णा पडूळ, सय्यद अझहर, शेख शकील, विनोद रत्नपारखे, विजय पवार, विनोद यादव, योगेश पाटील, किशोर गरदास, गोपाल मोरे, आनंद वाघमारे, राजन बर्टी, प्रमोद अल्हाट, गुड्डू खान, करीम लिडर, विकास जगधने, अशोक भगत, शेख फारुख, गणेश चांदोडे, बाबासाहेब सोनवणे, जावेद अली, नारायण वाढेकर, शेख इर्शाद, नारायणराव शिंदे, जलिंधर डोईफोडे, रघुवीर गुडे, शेख वसीम, बाळकृष्ण कोताकोंडा, संजय पाखरे, अनास चाऊस आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.