परतूर । प्रतिनिधी – परतूर – मंठा मतदार संघात मा.आ.सुरेशकुमार जेथलिया यांच्या माध्यमातून काँग्रस चे प्रचंड वातावरण असून येणार्या निवडणुकीत काँग्रेसचाच आमदार असेल असे प्रतिपादन जालना जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी केले.
माजी आ. सुरेश जेथलिया यांच्या नेतृत्वात परतूर-मंठा-नेर सेवली काँग्रेस कमिटीच्या वतीने आष्टी या ठिकाणी आयोजित नागरी सत्कार व प्रवेश सोहळा निमित्त ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जालना जिल्हा प्रभारी मा.आ.नामदेवराव पवार, आ.कैलास गोरंटयाल, जिल्हा अध्यक्ष राजेभाऊ देशमुख, राजेंद्र राख, शेख महेमूद, प्रभाकर पवार, बालासाहेब आकात, किसनराव मोरे, पांडू आबा सोळंके, अण्णासाहेब खंदारे, बाबाजी गाडगे, शामसुंदर काळे, सुभाष मगरे, बद्रीभाऊ खवणे, एजाज जमीनदार, इंद्रजीत घनवट, हाजी रहेमत खान, शाखेर मापेगावकर, जगन लाटे, सुखलाल राठोड, संतोष दिंडे, दादाराव खोसे, योगेश पा. अवचार, सूर्यभान मोरे, मंजुळदास सोळंके, परमेश्वर सोळंके, पांडुरंग कुरधने, आणिकराव डवले, सुरेशजिजा सवने, सिद्धेश्वर अंभुरे, विकास खुळे, पंजाबराव देशमुख, सादेक जाहगिरदार, अजीम कुरेशी, मोसिन जमीनदार, आसेफ जमीनदार, मोईन कुरेशी, शबाब कुरेशी, सारिका वरणकर, सौ. खाडे उपस्तिथ होते.
सत्काराला उत्तर देतांना खा.काळे यांनी म्हणाले कि गेली 10 वर्ष जेथलिया आणि मी पराभवाला सामोरे गलो आहे मात्र न खचता तितक्याच जोम्याने पक्षाशी एक निष्ठ राहत आम्ही दोघांनीही आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात पक्ष चळवळ मोठ्या प्रमाणात उभारली व कार्यकर्त्यांना सांभाळत आपले कार्य चालूच ठेवले त्याचेप्रती फळ मला जसे लोकसभा निवळणुकीत मिळाले तसेच जेथलिया यांना येणार्या विधानसभा निवडणुकीत मिळणार असून ते आमदार म्हणून ते पुन्हा आपल्या सेवेत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच महायुती प्रशासनावर चौफेर टीका करत महाविकास आघाडी ला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.जिल्हा निरीक्षक मा.आ.नामदेवराव पवार यांनी महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढत राजगढ येथील छत्रपती शिवारायांच्या पुतळ्याच्या बांधकामात देखील ह्यांनी भ्रष्टाचार करण्याचे सोडले नसल्याचे म्हणाले. व अशीच निकृष्ट दर्ज्यांची कामे संपूर्ण राज्यात चालू असून संपूर्ण महाराष्ट्राची वाट लावली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले तसेच आपल्या मनोगतात जालना जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेभाऊ देशमुख म्हणाले की जेथलिया यांनी पक्षाशी एक निष्ठ राहत मतदारसंघात पक्ष संघटन बळकट केले असून विरोधी बाकावर असतांना देखील कार्यकर्त्यांचे मनोबल न खचू देता जेथलिया यांनी एक सक्षम नेता म्हणून आपला परिचय दिलेला आहे आणि या मुळेच काँग्रेस पक्ष आपला मतदारसंघ कदापि सोडणार नसल्याची त्यांनी ग्वाही दिली. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन करत काँग्रेस चे भविष्य उज्वल असल्याचे ते म्हणाले यावेळी जेथलिया यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत म्हणाले कि सत्तेत नसतांनाही कार्यकर्त्यांनी कुणाच्याही अमिशाला बळी न पडता माझी कधीच साथ सोडली नाही उलट प्रचंड प्रमाणात आज मतदारसंघाचे भाजप पक्षाचे मातब्बर कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे.हा पक्षासह एक प्रकारे माझ्यावर टाकलेला विश्वास असून ह्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.भविष्यात याच कार्यकर्त्यांना स्वतः च्या पाया वर उभा करत पक्षाला देखील चांगले दिवस आणल्या शिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे म्हणत मला तुम्ही साथ द्या अशी अंतर हाक त्यांनी मारली या वेळी अनेकांनी आपल्या मनोगतात कार्यकार्त्यंना कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले या वेळी मा.आ.सुरेश जेथलिया यांच्या नेतृत्वात विश्वास ठेऊन भाजप जिल्हा उपध्यक्ष सिद्धेश्वर पाटील सोळंके,प्रफुल्ल आबा शिंदे,शेख हबीब,कादिर भाई,राजेंद्र राठोड, अनिल जाधव, जगन्नाथ आढे यांच्यासह लिखिल पिंप्री व अकोली येथील 35 वर्ष जुने सहकारी अशोकराव देशमुख यांचे चिरंजीव अमर देशमुख व मालघन कुटुंबातील प्रमुख तसेच प्रकाशनाना सोळंके यांच्या सह शेकडो समर्थकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.पक्ष प्रवेशाची यादी इतकी मोठी होती कि काही समर्थक सत्कारा पासून वंचित राहिले यामुळे युवा नेते नितीन जेथलिया यांनी सर्वांचे शाब्दिक सत्कार करून दिलगिरी व्यक्त केली.
या कार्यक्रमाची जय्यत तयारी आष्टी येथील कार्यकर्त्यान मार्फत चालू होती.नागरी सत्कारमूर्ती खा.कल्याण काळे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या अतिशबाजीने आष्टी परिसर दणाणून गेला युवा नेते नितीन जेथलिया व सिद्धेश्वर सोळंके यांच्या नेतृत्वा खाली निघालेल्या मोटारसाईकल रॅलीला प्रचंड प्रतिसाद देत शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता व खा.कल्याण काळे यांना वाजत गाजत शहरातून कार्यक्रम स्थळा पर्यंत रॅलीच्या माध्यमातून आणतांना जागोजागी उत्साही कार्यकर्त्यांनी खा.कल्याण काळे सह मा.आ. सुरेश जेथलिया यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन जेथलिया यांनी केले तर आभार युवा नेते तारेख सिद्धीकी यांनी व्यक्त केले.