जालना । रिसोडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला बदनापूर येथे मोठा अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी तर पाच ते सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना आज सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली आहे.
बदनापूर जवळ रस्त्यावर असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स डिव्हायडरवर आदळली आणि रोडवर पलटी झाली. यामध्ये 7 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते असे समजते. अपघाताची माहिती मिळतात बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान ट्रॅव्हल्स रोडवर आडवी झाल्याने जालना रोडवर वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने क्रेन बोलावून दोन्हीही वाहने बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.