शिंदे गटाचे जालना युवासेना शहरप्रमुख अब्दुल सगीर यांचा राजीनामा; रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी समर्थन केल्याचा ठेवला ठपका

10

जालना । प्रतिनिधी – मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणारे रामगिरी महाराज यांना समर्थन केल्याने पक्षाचे प्रमुख महाराष्ट्रचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याने शिवसेने चे जालना युवासेना शहर प्रमुख अब्दुल सगीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
जगाला शांतीचे संदेश देणारे प्रेषित पैगंबर यांच्याबाबत रामगिरी महाराज यांनी अतिशय बेताल वक्तव्य केल्याने मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या परिणामी मुस्लीम समाजाच्या वतीने ठिक ठिकाणी रामगिरी महारांजाच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात अनेक शहरामध्ये धरणे, मोर्चे, आंदोलने काढण्यात येत आहेत. अशातच ज्या रामगिरी महाराजाने पैगंबर विषयी अपशब्द वापरले त्यांना पक्षाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी त्यांच्या मंचावर जाऊन पाठिंबा दिल्याने या पक्षात राहण्यास योग्य वाटत नसल्याने शिवसेनेचे जालना युवासेना शहरप्रमुख अब्दुल सगीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
अब्दुल सगीर हे मागील काही वर्षांपासून शिवसेनेत शिंदे गटाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. शिवसेना नेते अर्जूनराव खोतकर यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखल्या जायचे. पक्षासाठी त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. विशेष म्हणजे मुस्लीम समाजाला तसेच तरूणांना शिंदेंच्या शिवसेना पक्षासोबत जोडण्याचे काम त्यांनी मोठ्या कुशलतेने केलेले होते. परंतु नुकतेच रामगिरी महाराजांनी इस्लाम आणि पैगंबर बद्दल नको ते वक्तव्य केल्याने इस्लाम धर्मासह पैगंबराची अवहेलना झाली असल्याने शगीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
यावेळी माध्यमांशी बोलताना अब्दूल सगीर म्हणाले की, अख्ख्या जगातील मुस्लीम समाज आपल्या पैगंबर विषयी अपशब्द खपवून घेत नाही. अशा परिस्थितीमध्ये यापुढे शिंदे सेनेच्या पदावर राहणे शक्य नसल्याचे सांगत युवासेना जालना शहरप्रमुख पदावर राहणे शक्य नसल्याने आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सगीर म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, या प्रकरणाचे सोशल मिडियावर जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत. ते करू नये कारण प्रेषित पैगंबर हे राजकारणाचा विषय नसून कोणीही या विषयावर राजकारण न करता आपआपल्या परिने निषेध नोंदवावा असे अवाहन त्यांनी केले.