जालना । प्रतिनिधी – येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दि.31 शनिवार रोजी दुपारी 2 वा. च्या सुमारास राष्ट्रीय पोषक आहार सप्ताहचे उदघाटन थाटात संपन्न झाले. आरोग्य हे औषधी घेण्यापेक्षा सकस संतुलित पोषक आहार, नियमित व्यायाम, योगा, ध्यान व सकारात्मक आचार विचार याने वृंधिगत होत असते त्या करिता प्रत्येक व्यक्तीने अभ्यासपूर्ण जीवनसत्व युक्त आहार घ्यावा असे आवाहन उदघाटक अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र गाडेकर यांनी केले. याप्रसंगी नर्सिंग विद्यार्थ्यांनी आहाराबाबत प्रदर्शन व मार्गदर्शन केले.
यावेळी आहारातद्य श्रीमती जोशी, उप प्राचार्य किरण जाधव, मेट्रोन गायकवाड, प्रमुख पाहुणे श्री बोर्डे, ताहेर डॉक्टर्स, नर्स, अधिकारी, कर्मचारी शिक्षक, विद्यार्थी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक आदींची उपस्थिती होती.