भोकरदन । प्रतिनिधि – भोकरदन शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसंदिवासी वाढतच जात आहे, यामुळे महिलांना व सुजाण नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे, या साठी एम आय एम पक्षातर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे, कुंभकरण च्या गाढ झोपेत असलेल्या प्रशासनाला जगवण्यासाठी मागील दोन दिवसांपासून एम आय एम चे पदाधिकारी आमरण आणशन करत होते, आज जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या पुढाकाराने मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून, मुख्यअधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण कर्त्यांची भेट घेतली व मुख्यधिकारी याच्याशि चर्चा केली या विषय वर काय उपाय योजना करता येईल ते तत्काल करण्यात यावा, व जनतेचे प्रश्न लवकर मार्गी लावावे असे सांगण्यात आले, एम आय पक्षाचे माजी खासदार इम्तियाज़ जलिल याच्याशी दुरध्वनि द्वारे सम्पर्क करून भोकरदन चे मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांना या प्रकरणात लक्ष घालून तोडगा काढावा पाण्यासाठी व भोकरदन शहरातील नागरिकांसाठी माझ्या कडून जे मदत होतील ते पूर्ण करण्यात ची जवाब दारी माझी आहे तुम्हाला जि मदत लागेन ते मि पूर्ण करण्याची आश्वासन मा.खासदार इम्तियाज जलील यांनी दिले आहे.
आणि भोकरदनमध्ये कायम स्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील रहिवाशांचे हाल होत असून, परिसरातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.भोकरदन शहरातील नागरिकांना पंधरा दिवसांनी तर कधी महिनाभराने पाणीपुरवठा होत आहे.यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. शहरवासीयांच्या पाण्याच्या समस्येसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात यावा जेणेकरून महिला व शालेय विद्यार्थ्यांना हंडे घेऊन पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागू नये, अशी मागणी एम आय एम पार्टिचे कार्यकर्त्ता शेख जावेद, सिराज पठान, नुज़ेर शाह, रिज़वान बेग साहेब शेख, फारुख शेख फरदिन, सय्य्द समीर आधि उपस्थिति होती.