जालना । प्रतिनिधी – शहरातील रामनगर परिसरात असलेल्या ठाकरे किड्स शाळेत शुक्रवार (दि 30) रोजी जुन्या नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उदघाटन शरद वडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थी व पालक यांनी या जुन्या नाण्यांच्या प्रदर्शनास भरभरून प्रतिसाद दिला. प्रदर्शनासाठीची नाणी हि शरद वडगावकर व त्यांचे चिरंजिव राहुल वडगावकर व सौ. दिपाली खरात यांनी अनेक वर्षांपासून जपून ठेवली होती. त्या जपून ठेवलेल्या नाणी या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शनामध्ये पुरातन राजे महाराजांच्या कालीन, निजाम कालीन, ब्रिटिश कालीन नाणी तसेच जुन्या भारतीय नाणे हि ठेवण्यात आले होते. पालक आपल्या काळात वापरलेल्या नाण्यांचा उल्लेख करताना आढळली. प्रदर्शनाच्या तयारी साठी शाळेतील शिक्षिका राजश्री माचेवार, प्रतीक्षा कनकुटे, रसिका दिक्षित, आदिती लोळगे, वैष्णवी पोटाबत्तीनं यांनी परिश्रम घेतले. तर शाळेच्या संचालिका सौ. रंजना ठाकरे यांनी विद्यार्थ्यांनीही हा नाणी जमा करण्याचा छंद जोपासावा असे आवाहन केले. सुत्रसंचालन रसिका यांनी केले तर आभार आदिती लोळगे यांनी मानले.