जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी  दोन सक्षम प्राधिकाऱ्यांची  केली नियुक्ती

42

जालना – शासनाने जालना जिल्ह्यामधून जाणारा जालना-जळगाव हा रेल्वेमार्ग घोषित केलेला आहे. हा रेल्वेमार्ग जिल्ह्यातील जालना, बदनापूरसह भोकरदन तालुक्यातून जात आहे. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तरी या कामी जालना व बदनापूर तालुक्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सुरिता सुत्रावे तर भोकरदन तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

            जालना-जळगाव या रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे कामकाज करतेवेळी संपादित होणाऱ्या जमिनीबाबत क्षेत्र, वहिवाट व जमिनीवरील फळझाडे , बांधकामे यांची अचुक नोंद होवून योग्य तो मोबदला भुधारकास, संबंधितास मिळाव व त्यामधील गैरप्रकार होवू नये यासाठी संपादीत क्षेत्राचे ड्रोन सेव्हर व उपग्रह छायाचित्रांसह केएमएल फाईल्स तयार करुन त्यानूसार मोबदला वाटपाची कार्यवाही होणार असल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी दिली आहे.

जालना-पुलगाव राष्ट्रीय महामार्ग

जालना ते पुलगाव हा राष्ट्रीय महामार्ग 753 सी जालना तालुक्यातील आठ गावांमधून जाणार असून त्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सरिता सुत्रावे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सक्षम प्राधिकारी म्हणून अमरावती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे दिला आहे.