श्री स्वामी समर्थ केंद्राव्दारे यंदाही सव्वा कोटी महावृक्षारोपण अभियान – नितीन मोरे; पार्थ सैनिकी शाळेत 1100 झाडांची लागवड

11

जालना | प्रतिनिधी – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ केंद्राव्दारे े पर्यावरण संवर्धनासाठी यंदाही सव्वा कोटी महावृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत रोपांची लागवड व त्याचे सवंर्धन केले जाणार आहे, े, अशी माहिती स्वामी समर्थ केंद्राचे गुरूपुत्र नितीनभाऊ मोरे यांनी दिली.
28 ऑगस्ट 2024 रोजी खरपुडी (ता.जालना) येथील पार्थ सैनिकी शाळेत दिंडोरी ( जि. नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ केंद्राचे गुरूपुत्र नितीन मोरे व पार्थ सैनिकी शाळेच्या सचिव मनिषाताई टोपे यांच्या हस्ते महावृक्षारोपण लागवडीचा शुभारंभ पार पडला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात नितीनभाऊ मोरे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मराठवाडा विभागाचे समन्वयक विलासराव देशमुख, माजी सभापती नानाभाऊ उगले, प्राचार्य मोहन नेहरे, संजय दाड, विलास देशमुख यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना नितीनभाऊ मोरे म्हणाले की, मानवाने आज निसर्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. झाडांची बेसुमार कत्तल होत असून, पर्यावरणावर घाला घातला जातो. त्यामुळे गुरुमाउलींच्या आज्ञेनुसार केंद्रातर्फे राज्यासह देशभर सव्वा कोटी महावृक्षारोपण आणि संवर्धन अभियान राबविले जात आहे. वृक्षलगावडीमध्ये सर्व वयोगटांतील सेवेकरी अत्यंत उत्साहाने सहभागी होत आहे. वृक्षारोपणानंतर त्या रोपांची देखभाल-संवर्धनही केले जाते. हा आगळावेगळा उपक्रम असून या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे असा पुनरुच्चार त्यांनी केला.
नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्थ सैनिकी शाळेच्या परिसरात 1100 झाडांची वृक्षलागड करण्यात आली.
यावेळी प्राचार्य नेहरे यांनी वृक्ष वल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती या अभंगातून वृक्ष संवर्धनाचे महत्व विषद केले. यावेळी बाल संस्कारी, युवक प्रबोधन कर्तव्यनिष्ठा, मुल्य शिक्षण, राष्ट्रप्रेम, संस्कृती, वृक्षसंवर्धन व प्रदुषणमुक्त भारत या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास पार्थ सैनिकी शाळेचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, पालक, सेवेकरी, शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.