जालना । प्रतिनिधी – माणसानं आळस, अज्ञान अंधश्रद्धे पासून स्वतःला सावरत विज्ञाननिष्ठ, विवेकी बनत सुजाण समाज निर्माणाचा ध्यास घ्यावा. लोकहिताला प्राधान्य द्यावे. समाजकार्य करताना छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू -आंबेडकर आदी थोर षुरुषांनी सांगितलेल्या पुरोगामी, भेदभाव विरहित अशा विधायक विचारांची कास धरावी, अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीचे कार्य करावे, असे आवाहन समाजधुरीण इंजि.विष्णू सोनूने यांनी केले.
आनंदगड, जालना येथील मातृतिर्थ या निवासस्थानी आप्तसगेसोयरे, मित्र मंडळींच्या वतीने वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात सत्कार मुर्ती विष्णू सोनूने ,सौ.अंजली सोनूने उपस्थित होते.प्रसंगी पोलीस पाटील पांडुरंग सोनूने,शिक्षक बी.ए.काकडे,दादाराव काळे,गजानन शिंदे,मीरा शिंदे,रंगनाथ शेळके,गिरीश पुजारी,ड.पुरुषोत्तम पाटील, प्राचार्य रविंद्र पडघान,मान्यवरांनी विष्णू सोनूने,अंजली सोनूने यांचा सत्कार करत आपले मनोगतातून शुभेच्छा ही दिल्या.इंजि.विष्णू सोनूने यांचे कार्यावर प्रकाश टाकणारे दै.हसरी दुनिया, बुलढाणा. महाराष्ट्र मिडीया, परभणी च्या वतीने विष्णूंजली हा विशेष अंक प्रकाशीत करण्यात आला. अंक काढण्या साठीची संकल्पना अभिलाष सोनूने, सौ.रंगोली सोनूने यांची असून अंजलीताई सोनूने यांचे मार्गदर्शनाखाली अंक पूर्णत्वाला आला. अंका साठी लेखकां सह हसरी दुनिया चे संस्थापक संपादक गणेश उबरहंडे, बुलढाणा. महाराष्ट्र मीडिया चे संस्थापक संपादक अजमत खान. अंक सजावट आणि मांडणी नसिर अन्सारी व गणेश उबरहंडे यांची असून चैतन्य पडघन, डॉ. यश पडघान, प्रा.अरुण पडघन, अमोल पाटील मेरा बु. यांनी परिश्रम घेतले.
लोक माणसात सम्यक परिवर्तन घडविण्या साठी शिक्षण महत्त्वाचे आहे. प्रामाणिक परिश्रमाला आदर्श अशा लोकशिक्षणा सह संस्काराची जोड दिल्यास लोकजीवनात सभ्यता वाढीस लागेल असा विश्वास देत आपण माणूस घडविणारे विद्यामंदिर निर्माण करु या ! असा संकल्प वाढदिवसा निमित्त विष्णू सोनूने यांनी जाहीर केला.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम करत माझे पती विष्णू सोनूने यांनी सर्वांना सोबत घेत एकसंघ असा नवंसमाज निर्माण केला याचा मला सार्थ अभिमान आहे. असे मत सौ.अंजली सोनूने यांनी मांडले. साहेबांच्या आचरणातून छत्रपती शिवरायांच्या आचार विचारांचा अनुनय दिसून येतो.जातपात न मानता सर्वधर्म समभाव जपत माणूस जोडण्याचे कार्य विष्णू सोनूने करत आहे.सर्वांना समान लेखत साहेबांनी आपल्या परिघातील लोकांना संधी दिली.त्या सर्वांनी संधीच सोनं केलं.मला खर्या भारताचं दर्शन इथं घडलं असे मत अजमत खान यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक सौ.रंगोली पडघन यांनी केले.लेखन कार्यात योगदान देणार्या सर्वांचे मी व अभिलाष सदैव ऋणी आहोत अशी भावना व्यक्त केली.
सूत्रसंचलन विजय निकम यांनी तर आभार प्रदिप सोनूने यांनी व्यक्त केले.