राज्य सरकारच्या महत्वकांक्षी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कटीबद्ध- आ. लोणीकर

7

परतूर । प्रतिनिधी – राज्यातील गोर गरीब, कष्टकरी,शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार तरुण,यांच्यासह जनसामान्य नागरिक, समस्या असो शासकीय लाभ यासाठी नेहमीच वयक्तिक लक्ष घालून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
मंठा तालुक्यातील के.सी.गुरुजी आश्रम शाळा पिंपरखेडा येथे बांधकाम कामगारांना किटचे वाटप व 75हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ,दलीत वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता (05 लक्ष ), ढोकसाळ येथील दलीत वस्तीमध्ये सभामंडपाचे (10 लक्ष),दलीत वस्ती अंतर्गत पाणीपुरवठा योजना (04 लक्ष ), हीवरखेडा येथे 69 हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ तर देवठाण मंठा येथे मारोती मंदिर सभामंडप (10लक्ष रुपये),दलीत वस्ती सभामंडप (10लक्ष रुपये),दलीत वस्ती पाणीपुरवठा (05लक्ष रुपये),गावठाण रोहित्र (04लक्ष रुपये) आदी कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेच्या माध्यमातून परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील 85000 च्या वर महिलांना अद्याप पर्यंत लाभ मिळालेला असल्याचे नमूद करतानाच प्रधानमंत्री आवास योजना मोदी आवास योजना शबरी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आदी योजनांच्या माध्यमातून मतदारसंघांमध्ये 18000 घरकुले मंजूर केली असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले पुढे बोलताना ते म्हणाले की महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांना विविध छोटे-मोठे उद्योगधंदे महिला बचत गटांना सुरू करता यावेत या संदर्भात आपण नियमितपणे पाठपुरावा करत आलो असून परतूर मंठा विधानसभा मतदारसंघातील महिलांच्या कर्ज प्रकरणासाठी आपण नियमित पुढाकार घेतला असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या माध्यमातून अनाथ असलेल्या मुलांसाठी विविध योजना सुरू असून या योजनांचा लाभ थेट देण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करत असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, मतदार संघातील 50 गावातील दलित वस्त्यांमध्ये आपण सभामंडपे मंजूर करून आणले असून अनेक ठिकाणचे काम आता सुरू झालेली आहे त्याचबरोबर 200 च्या वर गावांना विविध योजनांच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक धार्मिक सामाजिक कार्यक्रमांसाठी सभामंडप उपलब्ध करून दिली असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना ते म्हणाले की दिन दलित पिढीत दुबळा या सर्वांसाठी सर्वच आघाड्यांवर आपण काम केलेले असून कामाच्या माध्यमातून एक वेगळा ठसा आपण उमटवला असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना ते म्हणाले की शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग असेल वॉटर ग्रीड योजना असेल या योजनांच्या माध्यमातून मतदार संघाला वैभव प्राप्त करून दिले असून मतदार संघातील 300 गावांना थेट डांबरीकरणाने जोडले असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले
यावेळी संदीप गोरे गणेशराव खवणे राजेश मोरे नागेश घारे पंजाबराव बोराडे नाथराव काकडे मुस्तफा पठाण सोपान वायाळ तानाजी शेंडगे राजेश मस्के बाबाजी जाधव निवास देशमुख बाबासाहेब देशमुख सारंगधर देशमुख हरिभाऊ देशमुख बंडू नाना देशमुख भगवान देशमुख दीपक दवणे गोपीचंद पवार भारत राठोड भगवान कोळी सर्जेराव कोळी प्रकाश मगर बाळासाहेब देशमुख महादेव ठाकर के किसन तांबे छबाबाई चव्हाण, भरतराव उघडे दतराव खराबे विकास चव्हाण भरतराव उघडे बाबासाहेब राठोड उद्धव चव्हाण उद्धव खराबे राजू राठोड अविनाश चव्हाण महादेव उबाळे दत्ता खराबे रामदास कुलकर्णी भीमराव तांबे किसन उघडे भीमराव उघडे बेबीताई कुलकर्णी जया ताई खराबे जयश्रीताई खराबे सुभाष उघडे केशव उघडे निवृत्ती तांबे मुरलीधर बिडवे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती