जालना । प्रतिनिधी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालयाकडून दि. 6 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ठिक 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील सभागृहात लाभार्थी निवड समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध योजनेच्या लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील पात्र अर्जदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जालना जिल्हा कार्यालयामार्फत प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपये सुविधा कर्ज योजना व महिला समृध्दी योजनेअंतर्गत दि. 12 फेब्रुवारी ते 20 मार्च 2024 या कालावधीत कर्ज मागणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने हीींिीं://लशींर.ीश्ररीवल.ेीस या संकेतस्थळावर करुन लाभार्थीकडून मुळ प्रत महामंडळामध्ये स्विकारण्यात आली होती. सुविधा कर्ज योजनेअंतर्गत एकुण 647 कर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले असुन त्यापैकी 592 कर्ज मागणी अर्ज पात्र व 55 कर्ज मागणी अर्ज अपात्र झाले आहे. पात्र कर्ज मागणी अर्जापैकी पुरुष 408 व महिला 184 आहे सदर योजनेचे 55 कर्ज प्रकरणाचे उद्दीष्ट असुन त्यापैकी पुरुष 408 व महिला 184 व कर्ज मागणी अर्जाची व महिला समृध्दी कर्ज योजने अंतर्गत एकुण 69 कर्ज मागणी अर्ज प्राप्त झाले असुन त्यापैकी 59 कर्ज मागणी अर्ज पात्र व 10 कर्ज मागणी अर्ज अपात्र झाले आहे. पात्र कर्ज मागणी अर्जापैकी महिला 59 आहे सदर योजनेचे 30 कर्ज प्रकरणाचे उद्दीष्ट असुन त्यापैकी महिला 57 कर्ज मागणी अर्जाची अध्यक्ष लाभार्थी निवड समिती तथा अपर जिल्हाधिकारी जालना यांनी दिलेल्या मान्यतेनुसार लॉटरी पध्दतीने निवड करावयाची आहे. जिल्ह्यातील पात्र अर्जदारांची यादी महामंडळाच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.