20 वर्षांनंतर लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

4

परतूर । प्रतिनिधी – लाल बहादूर शास्त्री विद्यालय परतूर या शाळेचे तब्बल 20 वर्षांनंतर सन 2004 ची बॅच तब्बल वीस वर्षांनी एकत्र येऊन बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
लाल बहादुर विद्यालय या शाळेचे तब्बल 20 वर्षांनंतर सन 2003-2004 ची जुनी एस. एस. सी. (10 वी ब) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा परतुर येथील कृष्णमूर्ती हॉटेल सांस्कृतिक हॉलमध्ये झाला.
यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय जाधव हे होते.
आपले वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून 20 वर्ष झुकलेले हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनेक वर्षांनंतर आपण एकत्र भेटत आहोत. त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातील भावनाही होतीच; पण एकत्र आले आणि सर्वांनीच गळाभेट घेतली.
कार्यक्रमाचे नेटके संयोजन सर्व माजी विद्यार्थी यांनी केले यावेळी मुख्याध्यापक संजय जाधव, श्री पाटील, श्री सारस्वत, श्री खुरपे, श्री कोरके, श्री राऊत, श्रीमती लड्डा, श्रीमती सरोदे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनींनी अथक परिश्रम घेतले.