जालना । प्रतिनिधी – जिल्हाधिकारी यांना मराठवाडा शिक्षक संघ जिल्हा जालना यांच्या कडून मा. उपजिल्हाधिकारी जालना तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी जालना यांना निवेदन देण्यात आले निवेदनात खालील बाबतीत चर्चा करण्यात आली.
अशैक्षणिक कामातून शिक्षकांना वगळण्यात यावे. बि. एल. ओ. च्या कामातून शिक्षकांना वगळण्यात यावे. मागील बि. एल. ओ. चे मानधन अदा करण्यात यावे. 55 वर्षे वय असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळण्यात यावे. महिला कर्मचारी ना निवडणूक कामातून वगळण्यात यावे. कर्मचारीना स्वत: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिलेल्या निवडणूक मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यात यावे.
खाजगी शिक्षक संस्थातील शिक्षकांना निवडणूक डिव्टी कार्याध्यक्षाची जबाबदारी म्हणून देण्यात येऊ नये.
अशी चर्चा उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी हदगल साहेब यांच्या समवेत करण्यात आली. आपल्या मागण्या संदर्भात सकारात्मक दृष्टीकोन ठेवले. तात्काळ या बद्दल एक बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल. असे अभिवचन देण्यात आले. सद्यस्थितीत भविष्यात विधानसभा निवडणुकीतील कामाचा व्याप आहे. सर्व गोष्टी वर सखोल चर्चा झाली.या वेळी मराठवाडा शिक्षक संघ चे केद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे सर जिल्हा कार्याध्यक्ष सय्यद फरखुंद अली बट्टेवार सर व इतर प्रवेक्षक व बि.एल.ओ.मोठ्या संख्येने उपस्थित होते.