अतिक्रमणावर उभारलेली दोन मजली इमारत पाडली; महानगर पालिकेची कारवाई

99

जालना । प्रतिनिधी – जालन्यात अतिक्रमणावर उभारलेली दोन मजली इमारत महानगर पालिकेनं जमिनोदोस्त केलीये. शहरातील समर्थनगरमध्ये ले आऊट मधील ओपन स्पेस वर एका व्यक्तीनं अतिक्रमण करून दोन मजली इमारत बांधली होती. त्यानंतर त्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी महानगर पालिकेला केली होती. आज दि.27 मंगळवार रोजी दुपारी दोन वा. च्या सुमारास महानगर पालिकेनं पोलिसांचा रितसर बंदोबस्त घेवून या दोन मजली इमारतीवर कारवाई केली. जेसीबीच्या सहायानं पालिकेनं या अनधिकृत ईमारती बांधकाम पाडत जमिदोस्त केली आहे. बनसोडे नावाच्या व्यक्तीनं हे बांधकाम केलं असल्याची माहिती आहे. दरम्याम नागरिकांनी कुठेही अतिक्रमण करून अशा पद्धतीनं बांधकाम करू नये अन्यथा त्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालिका कर्मचार्यांनी दिली आहे. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.