पतसंस्थांनी महिती व्यवस्थापन प्रणाली अद्ययावत ठेवावी : उपनिबंधक वरखडे

प्रशिक्षण शिबिर : आव्हाने, महिला सक्षमीकरण, अशा विषयांवर परिसंवादात नवी दिशा

78

जालना । एम. आय. एस. हा संस्थेचा आरसा असून पतसंस्थांनी राखीव, संस्था, तरलता असे सर्व निधी, जोखीम वित्त भांडवलाचे प्रमाण नियमानुसार राखून माहिती व्यवस्थापन प्रणाली अद्ययावत ठेवावी असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक पी. बी.वरखडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि जालना जिल्हा नागरी व कर्मचारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ( ता. १६) हॉटेल सॅफ्रॉन येथे पतसंस्था संचालक, अधिकारी वृंदांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या उद्दघाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी सहाय्यक निबंधक शरद तनपुरे, फेडरेशन च्या राज्य संचालिका ॲड.
सौ. अंजली पाटील, राज्य व्यवस्थापिका सुरेखा लवांडे,सहकार तज्ञ शिरिष पोळेकर , फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष दादाराव तुपकर,उपाध्यक्ष सिध्दीविनायक मुळे, डॉ. विठ्ठल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपनिबंधक वरखडे यांनी बँकींग नियम, धोरणे यांत दररोज बदल होत आहेत. बदलते नियम , महाराष्ट्र बिगर कृषि वित्त संस्था नियामक मंडळ यांच्या सूचनांचे पालन व्हावे, या करिता पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांना सातत्याने प्रशिक्षण घेण्याची गरज असल्याचे वरखडे यांनी नमूद केले. सी. आर. आर. , एस. एल. आर. आणि कायदे, उपकलम या विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविकात राज्य व्यवस्थापिका सुरेखा लवांडे यांनी चळवळ चालविण्यास संघटनेचे महत्त्व, पतसंस्थांच्या अडचणी, सोडविण्यासाठी राज्य फेडरेशन कडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन दीपस्तंभा प्रमाणे उत्कृष्ट अध्यक्ष, व्यवस्थापक असे पुरस्कार देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्दघाटन सोहळ्या नंतर पुणे येथील सहकार तज्ञ शिरिष पोळेकर यांनी ” भांडवल पर्याप्तता निधी ” या विषयावर तर राज्य संचालिका ॲड. सौ. अंजली पाटील यांनी ” महिला सक्षमीकरण ” या वर चलचित्र फिती द्वारे सखोल मार्गदर्शन केले. या वेळी दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था, माऊली अर्बन व दुधना या संस्थांचा तसेच सहकार चळवळीतील समग्र योगदानाबद्दल राज्य महासचिव डॉ. शांतीलाल शिंगी,संचालिका अंजली पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सुञसंचालन डॉ. विठ्ठल पवार यांनी केले तर दादाराव तुपकर यांनी आभार मानले. या वेळी सिध्दीविनायक मुळे, अभय कुलकर्णी, संजय भरतिया, प्रसन्न जाफ्राबादकर, सतीश निर्वळ, सचिन वाणी, ॲड.दशरथ इंगळे, दीपक तुपकर, भगवान जायभाये, अशोकराव आगलावे, राजू बगळे यांच्या सह जिल्ह्यातील पतसंस्थांचे संचालक, प्रतिनिधींनी शिबीरात सहभाग नोंदवला.