जालना । प्रतिनिधी – शहरातील वार्ड क्रमांक एक संभाजीनगर येथे संभाजीनगर बॉईज आणि नजीर भाई मित्र मंडळ यांच्या वतीने सोमवार (दि 26) रोजी रात्री 10 वाजता गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी नजीर भाई मित्र मंडळाचे सदस्य पदाधिकारी व संभाजीनगर बॉईज मित्रमंडळाचे सदस्य पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित झाले होते कारण ही दहीहंडी महोत्सव म्हणजे शहरातील एक मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या दहीहंडीची उत्सुकता संपूर्ण शहरात दरवर्षी सालाबादप्रमाणे असते आणि यावर्षीही मोठ्या उत्सवात हा दहीहंडी सोहळा आज जालना शहरांमध्ये पार पडला आहे.
यावेळी बोलताना माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की नजीर भाई यांनी जो कार्यक्रम दहीहंडीचा आयोजित केला आहे, देशात राज्यात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी करत आहे, त्याला हे सडेतोड उत्तर आहे कारण एका मुस्लिम बांधवान दहीहंडी महोत्सव आयोजित करणे ही आजच्या युगाची एक सर्वधर्मसमभावतेचा संदेश देणारी दहीहंडी आहे, दहीहंडीच्या माध्यमातून सर्व द्वेष प्रत्येकाच्या मनातून निघून जावो आणि सर्व नागरिक गुण्या-गोविंदाने नांदो हीच अपेक्षा या दहीहंडीच्या माध्यमातून मी करतो. हिंदू असो का मुस्लिम असो सर्वात अगोदर आपण एक माणूस आहे, आणि माणसाने माणसासारखेच वागायला पाहिजे ना की दोन समाजात तेढ निर्माण करणे आज जालना शहरातून संपूर्ण देशाला एक नवा संदेश या दहीहंडीच्या माध्यमातून देण्यात आला आहे असे मत यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले आहे.