अंबड सुशिक्षित बेरोजगारांना तसेच शेतकर्यांना आर्थिक दृष्ट्या समृध्द करण्यासाठी सतीश घाटगे यांच्या प्रयत्नातून शेतमाल वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहे.यावल पिंपरी येथील कारभारी उगले व यावल पिंपरी तांडा येथील शिवाजी राम राठोड यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून 35 टक्के अनुदानावर शेतमाल वाहुतुकीच्या व्यवसायासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात आली.
गेल्या सात महिन्यापासून हा कार्यक्रम घनसावंगी विधानसभा क्षेत्रात सतीश घाटगे यांच्या सहकार्यातून राबविल्या जात आहे. या कार्यक्रमातून आतापर्यंत 30 लाभार्थींना शेतमाल वाहतुकीचे वाहने मिळवून देण्यात आली आहे. या वाहनामुळे अनेक युवकांना हक्काचा रोजगार मिळाला आहे. यावेळी आनंद बामणे, गणेश टकले यांची उपस्थिती होती.