जालना: रामगिरी महाराज यांनी प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य आणि द्वेषपूर्ण भाषण केल्याने त्यांना अटक करावी अशी मागणी जालना येथील जमत ए इस्लामी हिंद ने आज दिनांक 27 मंगळवार रोजी चार वाजेच्या सुमारास जिल्हाधिकार्यांमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय. नाशिक जिल्ह्यातील शाह पांचाळे गावात एका धार्मिक कार्यक्रमात धर्मगुरू रामगिरी महाराज यांनी प्रेषित मुहम्मद आणि इस्लाम धर्म यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केलीय. या अपमानास्पद टिप्पण्यांमुळे मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, आचार्य विनोबा भावे यांची भूमी असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याची ही संस्कृती नाहीये असं जमात ए इस्लामी हिंद ने म्हटलंय. रामगिरी महाराजांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा कमी केली असा आरोप करत जमात ए इस्लामी हिंद ने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केलाय. येवला (नाशिक), मुंब्रा (ठाणे), छत्रपती संभाजीनगर शहर आणि वैजापूर (छत्रपती संभाजीनगर), जालना येथे मुस्लिम समाजाने नोंदवलेल्या एफआयआर च्या आधारे आरोपीवर कठोर कारवाई आणि तात्काळ अटक करण्याची मागणी जमात-ए इस्लामी हिंदच्या पदाधिकार्यांनी केलीय. आपल्या राज्यातील सांप्रदायिक सलोखा बिघडवू इच्छिणार्या अशा लोकांविरुद्ध कडक उपाययोजना आणि तत्काळ कारवाई केल्याने आपल्या राज्यातील शांतता आणि जातीय सलोखा टिकून राहण्यास मदत होईल, असे मत जमात ए इस्लामी हिंद च्या पदाधिकार्यांनी निवेदन द्वारे व्यक्त केलंय.
यावेळी सचिव राष्ट्रवादी कांग्रेसचे खान एकबाल पाशा, जमीअतुल उल्मा हिंदचे सेक्रेटरी अय्यूब खान,
जमात ए इस्लामी हिंदचे शहर अध्यक्ष शेख इस्माईल,
जिल्हाधयक्ष चझग. शेख इब्राहिम, काज़ी गालेब,
मोहम्मद मुश्ताक सर, रियाज अंसारी, अबरार ख़ान शेख अहमद, सुभानी सर,सह मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..