जालना । प्रतिनिधी – शहरासह ग्रामीण भागात गौरी गणपती व ईतर सणासुदीच्या काळात वीज पुरवठा सुरळीत करा अशा सूचना शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी महावितरणच्या अधिकार्यांना दिल्या. आज 27 ऑगस्ट 2024 रोजी अर्जुनराव खोतकर यांनी कन्हैयानगर येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता श्री सरग यांच्या कार्याला भेट दिली व विजेच्या समस्या संदर्भात अधिकार्यासमोर बैठक घेतली .यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर ,जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, महानगरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले, योगेश रत्नपारखे सुधाकर वाडेकर यांच्यासह अधीक्षक अभियंता सरग, कार्यकारी अभियंता प्रशांत सोनार, कार्यकारी अभियंता 2 मठपती यांच्यासह महावितरणचे उपअभियंता अधिकार , व शाखा अभियंता गहाणे, नांगरे उपस्थित होते.
या बैठकीत खोतकर यांनी सांगितले की, जालना शहर आणि ग्रामीण भागात विजेची समस्या गंभीर बनली असून तासंतास वीज गायब असते, तक्रार करूनही यामध्ये सुधारणा होत नाही ,आता गौरी गणपती व इतर सणासुदीचे दिवस असून जनतेला या काळात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा.व सण साजरे करता यावे .नसता जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार राहा. असा सज्जड दमच उपस्थित महावितरणच्या अधिकार्यांना दिला. तसेच शहरासह ग्रामीण भागातील लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा बदलणे व इतर किरकोळ दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात यावी ,शहरातील नवनवीन वस्त्यांमध्ये वीज विद्युत पोल नाहीत त्यामुळे अक्षरशा जनतेने लाकडी पोलद्वारे वायर टाकून वीज घेतलेली आहे .त्यामुळे आपघात होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकरता येत नाही. करिता अशा नवीन वसाहतींचा तातडीने सर्वे करून त्या ठिकाणी वीजेचे पोल व ताराची व्यवस्था करून देण्यात यावी. जालना शहरात नुकत्याच रस्त्यावर आलेल्या विजेच्या खांबावर अपघात होऊन एका पोलीस कर्मचार्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यास खरंतर महावितरण जबाबदार आहे.वेळीच हे विजेचे खांब. हटविण्यात आले असते तर ही घटना घडली नसती .आता तातडीने असे रस्त्यावर आलेली विजेचे खांब हटविण्यात यावेत. जनतेला वीज विलापोटी महावितरण कडून मोठ्या प्रमाणात त्रास असून आवाच्या सव्वा बीलं दिली जाते.अशा तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत.तक्रार करूनही बिलांची दुरुस्ती वेळ वेळेवर होत नाही त्यामुळे नागरिकांना प्रचंड भुर्दंड सोसावा लागतो. याबाबतीत तातडीने सुसूत्रता आणावी. जळालेले विजेचे ट्रान्सफार्मर तातडीने भरून देण्यात यावेत जेणेकरून सण उत्सवाच्या काळात वीज पुरवठा सुरळीत राहील. नव्याने मंजूर असलेले सामनगाव, गुंडेवाडी, खरपुडी, येथील 33 के व्ही. केंद्राचे काम तातडीने हाती घेण्यात यावे. शेतकर्यांच्या सौर पंपाचे कामे संबंधी एजन्सी करण्यात टाळाटाळ करतात त्यांना तातडीने सूचना करून कामे करण्याचे आदेश द्यावेत. अशा स्वरूपाच्या समस्येचा पाढाच अर्जुनराव खोतकर यांनी महावितरणच्या अधिकार्यासमोर मांडला यामध्ये तातडीने सुधारणा करावी व नागरिकांची गैरसोय दूर करावी अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकार्यांना केल्या.
यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख दीपक राठोड, मनोज लाखोले, किशोर शिंदे,घोडे पाटील,शिवसिंग तिलवारवाले दिनेश भगत ,देवेंद्र बुंदले,संजय शर्मा, यांच्या सहर व ग्रामीण भागातील शेतकरी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.