जालना – शासकीय तंत्रनिकेतन येथे प्राचार्य डॉ. निनाद जावडे यांच्या अध्यक्षतेखाली व अँटी रँगिंग समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मण हाके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोहिबिशन ऑफ रँगिंग क्ट रुल्स रिस्पॉन्सिबिलिटीज अँड पेनल्टी या विषयावर संस्थेतील तृतीय वर्षीय विद्यार्थ्याकरीता व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रणिता भारसाकडे वाघ यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाच्या कामकाजाबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी इंटरनॅशनल युथ डे च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती देत विद्यार्थ्यांनी शरीराने व मनाने सुदृढ होण्याकरीता व्यायाम, ध्यान आणि थोर महापुरुषांच्या विचारांचे वाचन हे पुस्तकाच्या माध्यमातून करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना दिले. ड वाघुंडे यांनी अँटी रँगिंग कायदा 1999 बाबत विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाबद्दल अवगत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिव्याख्याता इंग्रजी प्रा. ए.एस. साळूंके, प्रस्तावना अधिव्याख्याता यंत्र अभियांत्रिकी प्रा.उमेश हिवराळे तसेच आभार प्रदर्शन अधिव्याख्याता संगणक अभियांत्रिकी प्रा. संदीप काळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अधिव्याख्याता अणुविद्युत प्रा. सुजाता जगताप यांनी केले. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. एन. आर. जावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.