जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची 29 रोजी आढावा बैठक

17

जालना – जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक दि. 29 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेली असून यामध्ये ज्या अर्जदारांना शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या विरुध्द भ्रष्टाचार/गैरव्यवहार/अफरातफर/विलंब तक्रार द्यावयाची असेल त्यांनी संबंधित तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे अथवा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सबळ पुरावे सादर करुन तक्रार देण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिती यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.