जालन्यात प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करण्यात आलं. अंबड तालुक्यातील लालवाडी येथे स्मशानभूमीसाठी रस्ता नाही. त्यामुळं पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला रस्ता करून देण्यासाठी अनेक निवेदनं दिली. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळं आज दिनांक 27 सोमवार रोजी एक वाजेच्या सुमारास प्रहार संघटनेनं आक्रमक होत. जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन केलं. दरम्यान प्रशासनानं स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ सोडवावाअन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की मौजे लालवाडी येथील स्मशानभुमी बांधकाम आज पर्यंत मंजूर झालेले नाही. अनेकवेळा ग्रामपंचायल लालवाडीच्या वतीने आपल्या विभागाला प्रस्ताव सादर केलेले आहे. आजच्या परिस्थितीत मौजे लालवाडी येथील जनतेची स्मशानभुमी बांधकाम नसल्यामुळे अत्यंत दयनिय अवस्था झालेली आहे. परीणामी पावसाळ्यामध्ये आपआपल्या शेतात अंत्यसंस्कार करण्यासाठी पावसात चिखल तुडवत जावे लागते,.
मागील अनेक वर्षापासून आपल्या विभागाला ग्रा.मा. नं. 136 व ग्रा.मा. नं. 16 हे दोन रस्ते खडीकरण करण्यासाठी निवेदन दिलेले आहे रस्त्या अभावी लालवाडी गावातील शेतकर्यांना शेतातील फळबाग जाग्यावर पडया भावात विकावे लागत आहे. रस्ता नसल्यामुळे पाणी असून देखील ऊस लागवड करता येत नाही. त्यामुळे आपण या प्रश्नकडे लक्ष देऊन आमचे वरील कामे जिल्हा नियोजन, जनसुविधा 30-54, 25-15, व शासनाचा कुठल्याही नियोजनामधून आपल्या स्तरावरुन मंजूर करुन दयावे. प्रशासनानं स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ सोडवावाअन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे.
यावेळी प्रदिप शिंदे, सावळा हरी शिंदे, जगन ठाकूर, सुदाम इंगोले, सुनील पंडित, सिद्धेश्वर पाटील, लखन शिंदे, नासिर पटेल, भाऊसाहेब शिंदे, कृष्णा शिंदे, जगन्नाथ कदम, कारभारी पवार, संतोष जाधव, करण चव्हाण, संदीप गावडे, दत्ता मुळे सह गावकर्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.