चमनचा राजा गणेश मंडळातर्फे गोरे, पांगारकर यांचा सत्कार!

9

जालना- येथील सुप्रसिध्द चमनचा राजा गणेश मंडळातर्फे गणेश फेस्टीवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे आणि गणेश महासंगाचे अध्यक्ष अशोक अण्णा पांगारकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी फेस्टीवलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील, दिनेश फलके, राजेंद्र राख, किरण गरड, अशोक उबाळे, शरद देशमुख, प्रा. राजेंद्र भोसले, फेस्टीलचे माजी अध्यक्ष साईनाथ पवार, गणेश फेस्टीवलचे माजी कार्याध्यक्ष सुरेश मुळे, जगन्नाथ काकडे पाटील, योगेश गरड, चंद्रशेखर वाळिंबे, सगिर अहेमद माऊली कदम, सतीश देशमुख, अशोक पडूळ, योगेश पाटील, संजय देशमुख, संजय देठे आनंद कुंडलिकर, अशोक आगलावे, शक्ती राजपूत, मंगेश देशमुख, प्रवीण शर्मा, सोनु नन्नवरे आदींसह गणेश भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी बोलतांना श्री. राजेंद्र गोरे म्हणाले की, तो इतिहास आठवला की आजही अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. गणेश महासंघाचे पदाधिकारी आम्हाला काहीही भाव देत नाहीत, आम्हाला विचारात नाहीत, असे वाटायचे परंतू नंतरच्या काळात डॉ. संजय पाटील यांनी मनावर घेतले आणि जालना गणेश फेस्टीवल अस्तित्वात आला. त्यानंतरच्या कार्यकाळातही या फेस्टीवल मध्ये बरेच चढ उतार पाहायला मिळाले. नंतर या फेस्टीवलमध्ये काळानुरुप बरेच बदल झाले. परंतू ते सर्वाअर्थाने योग्य होते, असे सांगून श्री. गोरे यांनी चमनचा राजा आणि गणेश महासंघाबद्दलही आपल्या भाषणातून माहिती दिली.यावेळी अशोक पांगारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.