जालना । प्रतिनिधी – छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकात शिवप्रेमींनी आज दिनांक 26 सोमवार रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केलाय. मालवणमध्ये वादळी वार्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. त्यामुळं राज्यभरात याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली असून जालन्यातही शिवप्रेमींनी आंदोलन केलं आहे, व सरकार विरोधात आपला रोज व्यक्त केला आहे, याप्रसंगी शेकडो शिवप्रेमींनी जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात झालेल्या घटनेचा निषेध करत सरकार विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते मोठ्या थाटात व जल्लोषात सरकारने गाजावाजा करत या पुतळ्याचे अनावरण केले मात्र या पुतळ्याचे सर्व काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे आणि वादळी वार्यामध्ये हा पुतळा जमीनदोस्त झाला आहे, एकीकडे सरकार पुतळा उभारून पुन्हा तो वादळी वार्याने पडल्याने सरकार विरोधात शिवप्रेमी मध्ये राज्यभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण या पुतळ्याचे उद्घाटन चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे मग या पुतळ्याचे काम चांगल्या दर्जाचे का नाही करण्यात आले असा सवाल यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित करत सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.
यावेळी विश्वंभर तिरुके, नन्नू भाई कांबळे, रोहित देशमुख, प्रदीप जाधव, विशाल वाघमारे, मधुकर शेंडगे, सोपान तिरुखे, अर्जुन घारे, विशाल इंगळे, बाळासाहेब डाके, अमोल नागवे, नितीन जाधव, नारायण पडूळ, आकाश गायकवाड सह मराठा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती..