जालना । प्रतिनिधी – राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिला युवक युवती विद्यार्थी शेतकरी शेतमजूर बांधकाम कामगार अंगणवाडी सेविका सांगणक चालक व वृद्ध नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वकांक्षी योजना केंद्र आणि राज्य सरकार राबवत असल्याने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या कार्यकाळात झालेला सर्वांगीण विकास कामाचा झपाटा अतिशय वेगाने चालू असल्यामुळे सेवली तालुका जालना येथील अनंता राऊत, गजानन राखे, विष्णू राऊत, शिवाजी राऊत, संतोष राऊत, गणेश पडूळ, गणेश जावळे, केशव सांगुळे, नेमनाथ महिराळ, शिवा डाके, भोलेनाथ मोरे, लक्षमन हजारे, डीगांबर राऊत, दत्ता मोरे, दत्ता झोरे, अषीकेश काळे, कृष्णा निवरे, ज्ञानेश्वर घुले, सावता काळे, सोनू मोरे, संता काळे, अंकुश पवार, संतोष जाधव, भानुदास झोरे, राजू झोरे, गजानन डाके, संदीप पवार, अर्जुन हजारे, सोनू खंदारे, इंदर जावळे, उनाजी तिवरे, आनंद सेवलीकर भागवत काळे, गणेश पडूळ, प्रभाकर पडूळ यांच्या सह शेकडो युवकांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, लोकप्रिय लोकनेते परतूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मा. श्री बबनराव लोणीकर साहेब आणी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. श्री राहुलभैय्या लोणीकर यांच्या नेतृत्व स्वीकारून आज श्री भक्ती निवास यशवंत नगर जालना येथे भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यासाठी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विकास पालवे व सेवली ग्रामपंचायतचे माजी सदस्य समाधान वाघमारे यांनी मोठा पुढाकार घेतला होता. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा जालना जिल्हाध्यक्ष संपत टकले भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास पालवे, मंठा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विलास घोडके, स्वरूप सानप, संतोष गाढवे, समाधान वाघमारे, राम पवार, संतोष खरात, सतीश खरात यांच्यासह लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.