जालना । प्रतिनिधी – शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात शिवसेना शाखेची स्थापना रविवार (दि 25) रोजी शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आली .यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख कालींदाताई ढगे, शिवसेनेचे महानगरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले, उपजिल्हाप्रमुख गणेश दादा सुपारकर ,उपशहर प्रमुख लक्ष्मण आप्पा अवघड, युवा सेना तालुकाप्रमुख राहुल गवारे, माजी नगरसेवक गोपी किसन घोंगडे,राहुल हिवराळे, राऊत मामा ,भारती काका आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अर्जुनराव खोतकर म्हणाले की, आपण कुठल्याही पदावर नसताना म्हाडा कॉलनी व परिसरातील विकास कामांना प्राधान्य दिले असून जवळपास 01 कोटी 15 लक्ष रुपयाचा निधी विकास कामासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून उपलब्ध करून घेतला आहे .यामध्ये प्रामुख्याने म्हाडा कॉलनीमध्ये जगताप यांच्या घरासमोर सभागृह बांधकामासाठी 15 लक्ष रुपये, सतीश किराणा समोर सभागृह बांधकामासाठी 10 लाख रुपये, भारती काका यांच्या परिसरातील भूमिगत नाली बांधकामासाठी 15 लक्ष रुपये , कॉलनी मध्ये सिमेंट रस्त्यासाठी 30. लक्ष रुपये, वडारवाडी येथे सिमेंट लक्षात साठी दहा लाख, रुपये वडारवाडी येथे सभागृह बांधकामासाठी 15 लाख रुपये, सटवाई तांडा येथे सिमेंट रोड बांधकामासाठी 10 लाख रुपये, लाडनिवास समोर सभागृह बांधकामासाठी दहा लाख रुपये, आदी विकास कामांचा समावेश आहे. खरे तर जे नगराध्यक्ष व आमदार म्हणून सत्ता भोगतात त्यांनीही जबाबदारी पार पाडायला पाहिजे होती, परंतु त्यांनी माढा कॉलनी व परिसराकडे डोकावून देखील बघितले नाही. त्यांनी या परिसराला विकासापासून दूर ठेवले आहे. आता येणार्या निवडणुकीत तुमच्या विकासाकडे दुर्लक्ष करणार्यांना धडा शिकवण्याची खरी वेळ आलेली आहे. त्यांनाही आता मतदानापासून दूर ठेवा . आणि मुख्यमंत्री पुन्हा एकनाथराव शिंदे यांना विराजमान करण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी शिवसेना शाखेची कार्यकारणी जाहीर केली. यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे उपशहर प्रमुख लक्ष्मण आप्पा अवघड ,शाखाप्रमुख म्हणून रतन लाड, उपशाखाप्रमुख, विजय लाड ,शत्रुघ्न धावडे ,सदस्य म्हणून प्रदीप वाघमारे ,धनंजय नरवडे, पवन साबळे, कुलदीप जुनी ,किशोर लांडगे, दत्ता लाड, गणेश खेडेकर आदीचा समावेश आहे.
या कार्यक्रमांमध्येही भाजपचे सरचिटणीस प्रकाशराव गोविंदराव मस्के व आरपीआयचे गौतम वाघमारे यांनी देखील शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांचेही सर्व मान्यवरांनी शिवसेना पक्षात स्वागत स्वागत केले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले म्हणाले की शिवसेनेच्या नवीन पदाधिकार्यांनी शिवसेनेचे ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यरत राहावे व आपले नेते मा.अर्जुनरावजी खोतकर यांच्या माध्यमातून आपल्या परिसराचा विकास करून घ्यावा आज शहरांमध्ये दररोज लाखो रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन उद्घाटन , लोकार्पण समारंभ मा. भाऊ यांच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. माढा कॉलनी परिसरात शिवसेनेची शाखा केल्यामुळे नवीन पदाधिकार्यांना मी शुभेच्छा देतो व त्यांचे अभिनंदन करतो.
यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रमुख कालींदाताई ढगे, नगरसेवक राहुल हिवराळे यांनी देखील उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी किशोर नरोडे, मनोज धानोरे, रामधन पवा,र प्रदीप तौर, अंकुश पवार ,संतोष लाड, किशोर विटेकर, सुधाकर धावरे, प्रवीण जगताप युवासेना विभाग प्रमुख , शरद ढाकणे, कांताराव रांजणकर, किरण शिरसाट ,किरण कोकाटे, रवींद्र ढगे ,अर्जुनराव अवघड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण शिरसाठ व सूत्र संचालन प्रविण जगताप युवासेना विभाग प्रमुख यांनी केले.यावेळी असंख्य महिला भगिनीं उपस्थितीत होत्या त्यांचे भाऊ यांनी रक्षाबंधन ची भेट देऊन स्वागत केले