जाफराबाद शहराची 49.43 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर – डॉ सुरेखा लहाने

31

जाफराबाद । प्रतिनिधी – शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा प्रयत्न यशस्वी. डॉक्टर सुरेखा लहाने, उपाध्यक्ष,व त्यांचे सर्व नगरसेवक सदस्य, यांच्या अथक परिश्रमातून जाफराबाद नगरपंचायत अंतर्गत जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरोत्थान स्वर्णजयंती अभियानाअंतर्गत जाफराबाद शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी 49.43 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. नगरपंचायत ला पत्र मिळाले आहे. ही योजना पाणीपुरवठ्याची खडकपूर्णा प्रकल्प तालुका देऊळगाव राजा या प्रकल्पाच्या जलाशयातून पाण्याचा हक्क मागणी2.251लं. घ. मी. प्रकल्पीय पाणी वापराच्या तुलनेत 14.45 % इतकी असून क्षेत्रीय वाटपाच्या मर्यादित 15 टक्के आहे. शहराची 2024 ची लोकसंख्या (30684) इतकी विचारात घेऊन मंजुरी देण्यात आली आहे असे शासनातर्फे कळविण्यात आले आहे. यासाठी नगरसेवक,उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सर्व कर्मचारी, यांनी सुद्धा शहराच्या विकासासाठी आणि या पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न केलेले आहेत त्या सर्वांचे डॉक्टर सुरेखा लहाने त्यांनी आभार मानले असून विकासाच्या कामामध्ये असे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. शहराच्या विकासासाठी अनेक योजना शासनाकडून आणायचे आहेत त्यासाठी सहकार्याची अपेक्षा आहे. जाफराबाद शहराचा सुंदर शहर म्हणून नावलौकिक मिळवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. विकासाचा प्रश्न प्रयत्न असेल अशा प्रकारचे निवेदन त्यांनी प्रसिद्ध दिले आहे.