काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लोधी मोहल्ल्यातील राजपूत बांधव शिवसेनेत

23

जालना । प्रतिनिधी – शहरातील लोधी मोहल्ला विभागात राजपूत समाजाचे प्राबल्य असून हा विभाग काँग्रेसचा बालेकिल्ला आहे म्हणून ओळखला जातो. या काँग्रेस बालेकिल्लाला शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सुरुंग लावला. त्यांच्या उपस्थितीत अनेक राजपूत युवकांनी व बांधवांनी युवासेना व शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष राव मोहिते,शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले, नगरसेवक माजी नगरसेवक महेश दुसाने ,शहर संघटक दिनेश भैया भगत, अमोल पैलवान धानुरे,माजी नगरसेवक प्रताप भैय्या वर्मा ,मेघराज चौधरी , मनोज धानोरे ,पांडुरंग शिंदे चतरु वर्मा दीपक काटकर,,किशोर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खोतकर म्हणाले की राजपूत समाज पूर्वी शिवसेनेच्या सोबत एक निष्ठेने काम.करत होता ,मध्यंतरीच्या काळामध्ये हा समाज शिवसेना पक्षापासून दुरावला गेला होता .आता पुन्हा हा समाज आपल्या माध्यमातून शिवसेना पक्षाशी जोडला जात आहे .याचा आपल्याला अभिमान असून आनंद होत आहे .यामुळे येणार्‍या निवडणुकीमध्ये हा समाज काँग्रेस पक्षाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपला विजय निश्चित होणार यामध्ये शंका नाही.
यावेळी राजपूत समाजासाठी सामाजिक सभागृह व महाराणा प्रताप नावाने प्रवेशद्वार बांधकाम करावे अशी प्रमुख मागणी समिजाच्या वतीने केली .यासाठी आपण प्रयत्नशील राहून समाजासाठी सुहज्ज सभागृह व महाराणा प्रताप नावाने प्रवेशद्वार मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील राहुत व मंजुर करून घेण्यात येईल असे सांगितले.
यावेळी राकेश बजरंगसिंग राजपूत मित्रमंडळ व बजरंगसिंग केवलसिंग राजपूत, दिनेशसिंग जुगलसिंग सूर्यवंशी, राजासिंग राधेश्यामसिंग राजपूत, रामसिंग चंदनसिंग राजपूत, विकाससिंग राजपूत ,भोलासिंग राजपूत, सज्जनशिंग राजपूत ,रोहितसिंग राजपूत, आशिषसिंग राजपूत, अभय चौधरी, अर्जुन राजपूत ,राकेश राजपूत, नरेशसिंग राजपूत, तुलजासिंग राजपूत, अर्जुनसिंग राजपूत, अरुणसिंग राजपूत, गणेश भैय्या सूर्यवंशी, रवीसिंग राजपूत, उमेश राजपूत, रूपचंद राजपूत, नरेश राजपूत, मोहन भैय्या चौधरी, भीमाशिंग राजपूत, शंकरसिंग राजपूत, राहुल चौधरी, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना युवासेनेत जाहीर प्रवेश केला या सर्वांचे शिवसेना उपनेते नेते अर्जुनराव खोतकर व शहप्रमुख विष्णू पाचफुले यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याबद्दल अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेनेचे कमलेश खरे ,माजी नगरसेवक नरेश खुदभय्ये,मनोज देवरे, राम घडे ,बाबा कुरेशी ,शिवसेनेचे अल्पसंख्याक विभाग उपजिल्हाप्रमुख नजीर भाई कुरेशी, किरण शिरसाट, गोविंद सोनवणे ,दत्ता राऊत, पांडुरंग खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.