जालना – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय खेलो इंडिया अंतर्गत खो-खो खेळाचे प्रशिक्षण केंद्र सुरु झाले आहे. तरी खो-खो केंद्रासाठी क्रीडा मार्गदर्शकासाठी शैक्षणिक पात्रतेसह खो-खो या खेळातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या उमेदवारांनी बुधवार दि. 4 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज जालना येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
उमेदवार 18 ते 45 वर्ष वयोगट, यामध्ये अतिउच्च कामगिरी/गुणवत्ता असल्यासच समितीच्या मान्यतेने 50 वर्ष पर्यंत. ऑलिंपिक/एशियन गेम्स/जागतिक अजिंक्यपद अधिकृत स्पर्धा सहभाग/पदक प्राप्त व प्रशिक्षणाचा अनुभव असावा. जागतिक करंडक स्पर्धा/एशियन चॅम्पियनशिप/साऊथ एशियन स्पर्धा/संबधीत खेळाच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग / पदक प्राप्त खेळाडू तसेच प्रशिक्षणाच्या अनुभव असावा. राष्ट्रीय किंवा राज्य पुरस्कारार्थी तसेच प्रशिक्षण अनुभव असावा. एनआयएस पदविका किंवा संबधित खेळाचे अधिकृत केलेले कोर्सेस किंवा बीपी एड/एमपी एड सह राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त किंवा नॅशनल गेम्स पदक प्राप्त प्रशिक्षण अनुभव असावा. राज्यस्तर खेळाडू बीपी एड/एमपी एड सह कमीत कमी 10 वर्षाचा प्रशिक्षणाचा अनुभव असलेले पात्र व्यक्ती/खेळाडू आपला अर्ज शैक्षणिक पात्रता व इतर कागदपत्रासह सादर करु शकतील. क्रीडा मार्गदर्शक म्हणून मानधन तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. तरी प्राविण्य प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह पुढील पात्रताधारकांनी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे ( 7588169493 ) यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.