जालना । प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी च्या वतीने बांगलादेश येथील हिंदू समजावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व बदलापूर येथील चिमुरड्या मुलीवर झालेल्या घटनेच्या निषेदार्थ संबंधित आरोपीवर तात्काळ कारवाही करण्यासाठी भाजप जालनाकडून निवासी उपजिल्हाधिकारी जालना यांना निवेदन करुन तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. जिल्हाधिकारी जालना यांना दिलेल्या निवेदनात म्हणाले आहे की बांगलादेश मधील बदलत्या राजकीय परिस्थिती मुळे तेथील हिंदू समाजावर अन्वनित अत्याचार होत आहेत, आत्तापर्यंत किमान 600 पेक्षा जास्त हिंदूंची हत्या झाली आहे, अनेक हिंदू मठ-मंदिरे यांची तोडफोड करण्यात आली आहे. भारत सरकारच्या पातळीवर योग्य तो न्याय तेथील अल्पसंख्यांक हिंदू समाजास मिळावा त्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी हि विनंती.
पश्चिम बंगाल मधील आर जी कर हॉस्पिटलमधील एका महिला रेसिडंट डॉक्टर वर रात्रीपाळीच्या वेळी अमानुष अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली व तेथील सरकारने हि आत्महत्या आहे असे भासवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न्य केले, अनेक दिवस उलटून सुद्धा योग्य तो तपास केला नाही. माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना असून पीडितेला व तिच्या कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळावा व या व अश्या प्रकारच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्यासाठी कायद्यात तरतूद करावी अशी विनंती आम्ही या निवेदनातून करीत आहोत.
बदलापूर येथील माणुसकीला काळिमा फासणार्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारातीळ दोषी व्यक्तीस देखील या जघन्य अपराधासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करीत आहोत व अश्या प्रकारच्या अपराध महाराष्ट्रात पुढील काळात घडू नयेत यासाठी योग्य ती व्यवस्था, कडक कायदे व शिक्षा महाराष्ट्र सरकारने अमलात आणाव्यात यासाठी विनंती करीत आहोत. या निवेदनावर जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पाठडे, महानगराध्यक्ष श्री अशोकअण्णा पांगारकर, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेशजी राऊत, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलीये, अर्जुनजी घेई, युवा मोर्चा शहरअध्यक्ष अमोल धानुरे, बाबासाहेब कोलते, निलेश गवळी, राजू गवई, नितीन कायंदे, अमोल काकड, कारण तळेकर, विलास जर्हाड, नागेश अंभोरे, सतीश केरकळ, दत्तु मिसाळ, निवृत्ती वानखेडे, तुळशीराम मोहिते यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.