जालना । प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यातील सेलू येथून छत्रपती संभाजीनगर येथे जाणार्या एका व्यापार्याचे चार लाख रुपये लुटणार्या टोळीस पोलीसांनी जेरबंद केले आहे. मौजपुरी पोलीसांनी हि कामगिरी केली आहे. तीघा आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सेलु जिल्हा परभणी येथील व्यापारी त्यांचे आई व मित्रासह स्विफ्ट डिझायर वाहनाने प्लॉटचा ईसार करण्याकरीता सोबत 4,00,000/- रोख रुपये घेवुन दिनांक 21.08.2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे जात होते. ते पोलीस ठाणे मौजपुरी जिल्हा जालना हद्दीमध्ये जालना मंठा हायवे रोडवरील बापकळ फाट्याजवळ आले असता त्यांचे पाठीमागुन आलेल्या मोटारसायकल वरील दोन ईसमांनी त्यांना अडवुन चाकुचा धाक दाखवुन त्यांनी ठेवलेल्या पैश्याची बॅग हिसकावुन पळुन गेले होते. सदर घटणेबाबत व्यापारी यांचे फिर्याद वरुन पोलीस ठाणे मौजपुरी येथे गुरनं 238/2024 कलम 309 (4), 3(5) भा.न्या.सं 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ वरीष्ठांचे सुचनेनुसार मौजपुरी पोस्टेचे प्रभारी अधिकारी श्री मिथुन घुगे हे स्टाफसह जालना मंठा हायवेवर सदर गुन्ह्यातील संशईत आरोपींचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार सदर गुन्हा हा ईसम नामे 1) सुनील अंकुश टाके याने त्याचे सहका- यांसह केलेला आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन सुनील टाके यास रामनगर येथे ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा त्याचे सहकारी 2) रमेश भारत ईद्रोखे 3) सुमीत कैलास कटारे यांचेसह केल्याची माहिती दिल्याने मौजपुरी पोस्टेचे अधिकारी आणी पोलीस अंमलदार आरोपींचा शोध घेत असताना वरील दोन्ही ईसम मंठा हायवेवर हिवरा फाटा येथे वावरत असताना मिळुन आले सदरील ईसमांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल 4,00,000/- रुपये रोख आणी गुन्ह्यात वापरेलेली मोटारसायकल व धारधार चाकु असे जप्त करण्यात आले असुन ईसम नामे 1) सुनील अंकुश टाके वय 25 वर्षे, 2) रमेश भारत ईद्रोखे वय 22 वर्षे दोघे रा.गायत्री नगर सेलु जि.परभणी. 3) सुमीत कैलास कटारे वय 20 वर्षे. रा.धनेगाव ता.सेलु जि.परभणी ह.मु.सेलु.यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असुन सदर गुन्ह्याचा तपास सपोनि श्री मिथुन घुगे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही अजयकुमार बन्सल, पोलीस अधिक्षक, जालना, आयुष नोपाणी अपर पोलीस अधिक्षक जालना, दादाहरी चौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग परतुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मौजपुरीचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोउपनि विजय तडवी धायडे, सपोउपनि / बिरादार, पवार, पोहेकाँ/बिरकायलु, चालक खरात, कोरडे, गोडबोले, दादा हरणे, कुटे पोलीस अंमलदार प्रशांत म्हस्के, डि.एल. वाघमारे, नितीन कोकणे, धांडे शिवनकर, ईंगळे, यांनी पार पाडली आहे.