जालना । प्रतिनिधी – अवैधरित्या वाळु विक्री करणार्या तीन वाळु वाळु तस्करांवर गोंदी पोलीसांनी कारवाई केली आहे. 17 लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांना गुरुवार (दि 22) रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन गोंदी शिवारातील सिद्धेश्वर फाटा येथे गोदावरी नदी पात्रातुन सागर सुनिल नानकशाही हा चालवत असलेला रंगाचा स्वराज 855ऋएलाल रंगाचा हेड असलेला टॅक्ट्रर ज्याचा चेसिज नंबर चइछइॠ55 अAएछउॠ40710व इंजन नंबर 47.5011/डएॠ23375 अत्ता ट्रॉलीसह गाँदी शिवारातुन नदी पात्रातुन वाळु चोरुन घेवुन जात असता मिळुन आला. तसेच इसम नाने – सागर शिवाजी शिंदे रा. गाँदी हा चालवत असलेला एक लाल रंगाचा स्वराज 744ऋएलाल रंगाचा हेड असलेला टॅक्ट्रर ज्याचा चेसिज नंबर चइछAत53अ Aउगउछ16882 व इंजन नंबर 43.3009/डनछ40992 अत्ता ट्रॉलीसह गोंदी शिवारातुन नदी पात्रातुन वाळु चोरुन घेवुन जात असताना सिध्देश्वर मंदीराजवळ मिळुन आल्याने तसेेच नवनाथ मधुकर सोळुंके रा. गोंदी हा चालवत असलेला स्वराज कंपनीचा 744दढछ लाल रंगाचा हेड असलेला टॅक्ट्रर ज्याचा चेसिज नंबर चइछइण5 3छएझढच83348 व इंजन नंबर एन4002/डऋङ44174 ट्राली सह पाथरवाला शिवार गोदावरी नदी पात्रातुन वाळु चोरुन घेवुन जात असता जप्त केला वरील तिन्ही टॅक्ट्रर अवैध वाळु करत असताना पोलीसांची चाहुल लागल्याने त्यावरील टॅक्ट्रर चालक हे जागीच टॅक्ट्रर सोडुन पळुन गेल्याने सर्व टॅक्ट्रर पंचासमक्ष जप्त करुन ते पोलीस वसाहत गोंदी येथे लावण्यात आले आहेत. एकुण 17 लाख पन्नास हजार रुपये किमंतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. व तिन ही टॅक्ट्रर चालकांविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणीे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आशिष खांडेकर पोहेकॉ/359 डोईफोडे पोहेकॉ /806 मुंढे, पोहेकॉ/1563 नागरगोजे, पोकॉ/858 पठाडे, पोकॉ/424 साळवे, पोकॉ/14 सिध्दीकी, पोकॉ/536 राठोड, पोकॉ/1296 पगारे आदींनी केली आहे.