जालना । प्रतिनिधी – महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध जालन्याच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मौलाना शेख फइम शेख हामजा यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महंत रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. त्या नंतर राज्यभरात मुस्लिम समाज बांधवांनी महंत रामगिरी महाराज यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक 23 शुक्रवार रोजी 1 वाजेच्या सुमारास जालना सदर बाजार पोलीस ठाण्यात मौलाना शेख फइम शेख हामजा यांच्या तक्रारीवरून रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध कलम 299, 302, 353(2), 356(2) (3) अन्वये गुन्हा दाखल. दरम्यान रामगिरी महाराजांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी मौलाना शेख फइम शेख हामजा यांच्यासह उमला इकराम व समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी मुफती फहीम साहब, हाफिज़ नूरुद्दीन, उमद बचाव तहेरीकचे अध्यक्ष अब्दुल हमीद, माजी नगरसेवक आरेफ भाई, अझर भाई, फारुख भाई, शकील खान, समाजसेवक शकीलसह मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..