ग्रामीण भागातील खेळाडूंना कमी लेखू नये

11

टेंभुर्णी । प्रतिनिधी – क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना व कै. मारोतराव देशमुख विद्यालय टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय खो – खो मुला मुलीचे क्रीडा स्पर्धेचे आयोजन कै. मारोतराव देशमुख विद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते या स्पर्धेचे अध्यक्ष मुख्याध्यापक समाधान समाधान दुनगहु होते .या कार्यक्रमाचे उद्घाटक टेंभुर्णी चे सरपंच गौतम म्हस्के हे होते प्रमुख उपस्थितीमध्ये गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी राम खराडे तालुका संयोजक. वाहेद पटेल व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते खेळाडूंना मार्गदर्शन करीत असताना सरपंच गौतम मस्के म्हणले की ग्रामीण भागातील खेळाडूंना कमी लेखू नये . काही काही खेळांमध्ये मैदान उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागाचा सराव होऊ शकत नाहीत. पण क्रीडा शिक्षक आणि मार्गदर्शकांनी खेळाडूचा मनापासून सराव केल्यास शहरी विभागाच्या खेळाडूंना आपण बरोबरी करू शकतो. तालुक्यामध्ये क्रीडांगणाचीअत्यंत आवश्यकता आहे असे त्यांनी प्रतिपादन केले खो खो खेळामध्ये 25 मुलीच्या संघाने सहभाग नोंदविला त्यामध्ये भास्करराव शिंगणे मोहरा राजमाता विद्यालय निमखेडा दीप भारती मोहरा छत्रपती शिवाजी वैद्य आश्रम शाळा माहोरा कै. मारोतराव देशमुख विद्यालय टेंभुर्णी जिजामाता विद्यालय हनुमान खेडा. समर्थ महाविद्यालय जाफराबाद न्यू हायस्कूल जाफराबाद राजे संभाजी विद्यालय जवखेडा राजमाता जिजाऊ टेभूर्णी जाफराबाद ई बी के विद्यालय टेंभुर्णी लिबुनी विद्यालय कुंभारझरी लिटल स्टार इंग्लिश स्कूल वडाळा जिल्हा परिषद प्रा शाळा शिंडी जिल्हा परिषद प्रा शाळा बोरगाव इत्यादी शाळांनी सहभाग नोंदवला. 14 वर्षे आतील खो खो मुली मध्ये मारोतराव देशमुख प्रथम 17 वर्षा आतील मुली मध्ये खो खो न्यू हायस्कूल जाफराबाद विजय संपादन केला या स्पर्धेचे पंच सागर तारू शिवाजी सोमनाथ दगडघाटे बालाजी मोहिते पावन गव्हाणे गजानन अंभोरे समाधान सुरवसे पवन लोखंडे योगेश अंभोरे अमोल राठोड मोलाचे सहकार्य केले तसेच मोहन मुनेमानिक तसेच मारोतराव देशमुख विद्यालय सर्व कर्मचर्‍यांचे सहकार्य लाभले