मयत शेतकरी रावसाहेब जाधव यांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा मंजूर

9

जालना । प्रतिनिधी – जालना विधानसभा मतदारसंघातील माळशेंद्रा तालुका जिल्हा जालना येथील रावसाहेब रघुनाथ जाधव या शेतकर्‍याचे पंढरपूर येथे विहिरीत पडून अपघातीअपघाती निधन झाले होते .सदर शेतकरी पंढरपूर येथे एका शेतकर्‍याकडे कामाला होता. या शेतकर्‍याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांच्या पत्नी श्रीमती अनिता रावसाहेब जाधव यांना माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी गोपीनाथ मुंडे अपघात योजनेअंतर्गत कृषी विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या, त्याप्रमाणे त्यांनी अपघात विमा संदर्भात प्रस्ताव दाखल केला होता. मा.खोतकर यांनी संबंधित अधिकार्‍याला तात्काळ यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.व तात्काळ महिलेला गोपीनाथ मुंडे अपघात योजने अंतर्गत लाभ मिळून द्यावा अशा स्वरूपाच्या केल्या सुचना केल्या होत्या.त्याप्रमाणे सदर मयत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना *दोन लक्ष रुपये गोपीनाथ मुंडे अपघात विमा* मंजूर करण्यात आला. असून या विमा मदतीचा धनादेश त्यांच्या नावे बँकेत खात्यात जमा करण्यात आला. मा. खोतकर यांच्या सहकार्यामुळे विमा मंजूर झाल्यामुळे मयतांच्या कुटुंबियांनी आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी दर्शना बंगला भाग्यनगर येथे मयतांची पत्नी श्रीमती अनिता रावसाहेब जाधव , वडील रघुनाथ जाधव,आई प्रयागबाई जाधव, मुलगी कुमारी पूजा रावसाहेब जाधव ,मुलगा बाळू रावसाहेब जाधव, यांनी शिवसेना उपनेते तथा माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर यांची भेट घेतली व समाधान व्यक्त केले.यावेळी त्यांच्या गावातील ज्येष्ठ शिवसेनेचे कार्यकर्ते शिवाजीराव जाधव व उपसरपंच बाळासाहेब जाधव व गणपत धोत्रे उपस्थित होते.